EX Corporate Employee Viral Video: कॉर्पोरेट जगतातील नोकरी म्हणजे सतत टेन्शन अन् ताणतणाव. कॉर्पोरेट जगतात नोकरी करताना त्याचा आरोग्यावर किती विपरित परिणाम होऊ शकतो, याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील तरुणाने आपण नोकरी सोडताच त्याला अनेक वर्षांपासून होत असलेला डोकेदुखीचा,मानसिक ताण आणि टेन्शनचा त्रास मिटल्याच दावा केला आहे. तसेच त्याचे सिगारेटचेही व्यसन सुटले.
नोकरी सोडताच आश्चर्यकारक बदल...!
दयाल नावाच्या व्यक्तीने इन्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा तरुण एक क्रिएटिव्ह डायरेक्टर, फिल्ममेकर आणि डिझायनर म्हणून काम करत होता असा दावा त्याने केला आहे. त्याने सांगितले की त्याला अनेक वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास होता जो त्याला अगदी सवयीचा आणि सामान्य वाटत होता. मात्र नोकरी सोडताच त्याचा हा त्रास नाहीसा झाला. तेव्हा त्याला कळाले की आपले शरीर इतके दिवस किती तणावाखाली होते.
VIDEO: आपली लेक, सून ऑफिसला कशी जाते? तरुणीने दाखवलं वास्तव, ठाणे स्टेशनवरील धक्कादायक व्हिडिओ
सोबतच दयालने त्याच्या व्हिडिओमध्ये आणखी एक मोठा दावा केला आहे. त्याने सांगितले की तो दिवसाला सुमारे २० सिगारेट ओढत असे. पण नोकरी सोडल्यानंतर, त्याने अचानक कोणताही दृढनिश्चय, शिस्त किंवा प्रेरणा न घेता धूम्रपान करणे बंद केले. तो म्हणतो की जेव्हा त्याचे मन शांत झाले तेव्हा सिगारेटची इच्छा नाहीशी झाली आणि त्याचे व्यसन आपोआप सुटले.
व्यसन सुटले, डोकेदुखी थांबली..!
नोकरी सोडल्यानंतर या तरुणाने स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल अनुभवले. त्याने स्पष्ट केले की तो आता अधिक सतर्क, शांत आणि स्पष्ट विचारसरणीचा झाला आहे. आहे. चित्रपट समजून घेणे, भावना अनुभवणे आणि वेगवेगळी मते स्वीकारणे त्याच्यासाठी सोपे झाले आहे. पूर्वी त्याला असे मानसिक समाधान मिळत नव्हते. तो आता सकाळी दडपण किंवा चिंतेशिवाय उठतो. कोणत्याही डेडलाईनचा त्रास नाही, उत्तर देण्याचे टेन्शन नाही, खोटे बोलण्याची किंवा कारणे सांगण्याचीही सक्ती नाही.
"तुम्ही असा त्रास सहन करत असाल तर आजच नोकरी सोडा. समाधान शोधा. पैशापेक्षा गरजेचं आहे ते समाधान. आपण समाधानी असू तर बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अन्यथा पगाराची स्लिपही व्यर्थ आहे, असा संदेश त्याने या व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नोकरी सोडल्यानंतर असे समाधान अनुभवल्याचे सांगितले आहे.