सोशल मीडियावर सध्या एका मुस्लिम तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत मोकळेपणाने सांगते, 'होय, मुस्लिम लोकसुद्धा शाकाहारी (Vegetarian) असतात.' तिच्या या स्पष्ट वक्तव्याने इंटरनेटवर खाद्यसंस्कृती आणि धार्मिक ओळख यावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या तरुणीने आपला मुद्दा अत्यंत साधेपणाने पण थेट मांडला आहे. ज्यामुळे तो आता समाजातील रूढ समजुतींवर प्रश्नचिन्ह उभा करत आहे. हा व्हिडीओ सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे.
‘व्हेज'ची अवहेलना का?
व्हिडिओमध्ये ही तरुणी विचारते की, 'मुस्लिम लोकही शाकाहारी असतात का?' आणि स्वतःच उत्तर देते, 'होय असतात, पण मांसाहारी मुस्लिम आम्हाला स्वीकारत नाहीत.' ती म्हणते, "आम्ही शाकाहारी आहोत हे समजावून सांगून थकलो आहोत. पण लोक ऐकत नाहीत." लोक तिला 'सालन-सालन खा, बोटी-बोटी बाजूला कर' किंवा 'बिर्याणीचे सुके तांदूळ खा, बोटी काढून टाक' असे सल्ले देतात. यावर तिचे म्हणणे आहे की, लोकांना शाकाहाराचा नेमका अर्थच कळलेला नाही. त्यामुळे ती आपला संताप ही व्यक्त करत आहे.
वैयक्तिक आयुष्यावर परिणाम
या तरुणीने लग्नाच्या (Marriage) विषयावर आलेला अनुभवही सांगितला आहे. ती हलक्या-फुलक्या शैलीत म्हणते, लग्नाची बोलणी करताना लोक म्हणतात की, 'तू नॉनव्हेज (Non-veg) खा किंवा नको खाऊ, पण तू बनवून आम्हाला खाण्यासाठी तरी दे. मगच आमच्या मुलाशी लग्न कर.' या व्हिडिओला आतापर्यंत 1000s पेक्षा अधिक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. काही युजर्सनी 'इतक्या स्पष्टपणे कोणी पहिल्यांदाच बोलले' असे लिहिले आहे. ती शाकाहारी असल्याने तीला आलेली अनेक मागणी परत गेल्याचं ही ती सांगते.
अनेक लोकांनी व्यक्त केल्या भावना
हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्याला अनेकांनी सकारात्मक पणे घेतले आहे. शिवाय या तरूणीच्या धैर्याचे ही कौतूक केले आहे. तर काहींनी 'ही नव्या विचारांची सुरुवात आहे असे स्पष्ट मत मांडले आहे. हा व्हिडिओ केवळ मनोरंजक नसून, खाण्याच्या सवयींवरून व्यक्तीची ओळख का ठरवली जाते, यावर विचार करण्यास भाग पाडणारा आहे. खाण्यावरून कोणाला जज करू नये. किंवा त्यावरून नाती जोडू नयेत असं ही काहींनी म्हटलं आहे.