पुन्हा एकदा ‘चांद नवाब’! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय’ Video Viral

Pakistan Viral Video : कराचीच्या चांद नवाब’ या व्हायरल व्हिडिओची आठवण करून देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pakistan Viral Video : पाकिस्तानच्या महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई:


Pakistan Viral Video : एका थरारक व्हिडिओमुळे सध्या पाकिस्तानमधील एक महिला टीव्ही रिपोर्टर चर्चेत आली आहे. पुराच्या पाण्यातून रिपोर्टिंग करत असताना, ‘माझं हृदय धडधडतंय' (Mera dil yun yun kar raha hai) असं म्हणत तिने आपल्या मनातली भीती व्यक्त केली. ‘कराचीच्या चांद नवाब' या व्हायरल व्हिडिओची आठवण करून देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये रिपोर्टरची भीती आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे पत्रकारिता करताना येणाऱ्या जोखमींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे व्हिडिओ?

मेहरुनिसा नावाच्या या महिला रिपोर्टरचा व्हिडिओ मूळात तिच्याच चॅनलने यूट्यूबवर शेअर केला होता. पुराच्या वाढत्या पाणीपातळीबद्दल ती बोटीतून रिपोर्टिंग करत होती. अचानक ती खूप घाबरल्याचे दिसते आणि ती मदतीसाठी ओरडते. “मित्रांनो, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. मला खूप अस्वस्थ आणि भीती वाटत आहे,” अशा शब्दांत तिने आपला जीव वाचवण्यासाठी याचना केली. तिचा व्यावसायिक चेहरा क्षणार्धात बदलला. तिच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘चांद नवाब'ची आठवण

सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओला ‘आणखी एक चांद नवाब मोमेंट' असे नाव दिले आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक रझा रुमी यांनीही हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. तिथे एका युजरने याला ‘न्यू मीम इन द हाउस' असं म्हटलं आहे, तर दुसऱ्या एका युजरने हा व्हिडिओ लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे, बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपोर्टर्स किती धोका पत्करतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

( नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय? )
 

Topics mentioned in this article