- मंगला लक्षदीप ट्रेन मध्ये रत्नागिरी स्थानकाजवळ खुल्या पद्धतीने दारू विक्री
- एक तरुणी बॅगमधून दारूच्या बाटल्या, पानमसाला आणि चकणा विकतानाचा व्हिडीओ व्हायरल
- ट्रेनमध्ये टीसी आणि रेल्वे पोलीस असूनही दारू विक्री कशी सुरु?
लाबं पल्ल्याच्या ट्रेनमध्ये सर्रास आणि खुलेआम दारू विकण्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बॅगमध्ये दारूच्या बाटल्या, गुटखा, पानमसाला विक्री करताना दिसत आहे. शिवाय तो दारू दारू दारू असे ओरडत ही आहे. कुणाला दारू हवी आहे का अशी ही विचारणा करत आहेत. रेल्वेत दारू हवे असलेले त्याच्या भोवती गोळा होत आहे. त्यानंतर तो सांगेल ती किंमत देवून दारू विकत घेतानाही काही लोक दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणता आहे हे समजले नसले तरी तो मंगला लक्षदीप ट्रेन क्रमांक -12617 मधला असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय तो रत्नागिरी स्थानकात शूट केल्याचं ही बोललं जात आहे.
मंगला लक्षदीप ट्रेन क्रमांक -12617 रत्नागिरी स्टेशनवर सकाळी दाखल झाली होती. त्यावेळी एक तरूण खुल्या पद्धतीने दारूची विक्री करत असताना दिसला आहे. विशेष म्हणजे गाडीत टीसी असतानाही असे प्रकार होत आहे. शिवाय रेल्वे पोलीसही नियमीत ट्रेनमध्ये फेऱ्या मारत असतात. असे असतानाही ही दारू विक्री इतक्या सहज पणे कशी होते असा प्रश्न पडला आहे. दारू सोबतच गुटखा, पानमसाला, दारूसाठी पाणी आणि चकणा ही पुरवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हे कोणाचा आशिर्वाद असल्या शिवाय होणार नाही अशी चर्चा रंगली आहे.
या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आहे. कोकण रेल्वे महामार्गावर यापूर्वी सिगारेट,गुटखा, या सारख्या पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून आले होता. आता त्यात भर पडून दारूही रेल्वेमध्ये विकली जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी आता काही प्रवाशांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने वेळेत यात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं ही बोललं जात आहे. रेल्वेत सिगारेट, दारू, गुटखा खाण्यास बंदी आहे. असं असताना इथं चक्क दारू विकली जात आहे. त्यामुळे हा हा विषय गंभीर बनला आहे.
शंभर आणि तिनशे रूपयांना ही दारूच्या बाटल्या विकल्या जात होत्या. ही घटना समोर आल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने विक्री केली जात आहे. ज्या लोकांकडे रेल्वेत खाण्याच्या वस्तू विक्रीचे लायसन नाही असे लोक ही गाड्यांमध्ये विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कोणाचेही नियंत्रण राहीले नाही. त्यामुळे वाट्टेल त्या गोष्टी रेल्वेत विक्री केल्या जात आहे. दरम्यान व्हायरल झालेला व्हिडीओ नक्की कुठला आहे याची पुष्टी एनडीटीव्ही मराठी करत नाही. पण कोकण रेल्वे मार्गावरील मंगला लक्षदीप रेल्वेतला तो असल्याचं बोललं जात आहे.