Social Media Tea Trend: जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन होते. संध्याकाळ झाल्यानंतरही या लोकांच्या चहा पिण्याच्या वेळेत बदल होत नाहीत. कदाचित याच कारणामुळे गावापासून शहरांपर्यंत रस्त्याच्या कडेला चहाची टपरी हमखास पाहायला मिळते, जिथे चहाप्रेमींची सतत गर्दी असते. आजकाल सोशल मीडियावर एका वेगळ्याच पद्धतीने चहा तयार करण्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडत आहे. चहाप्रेमींमध्ये या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हायरल चहाचा अनोखा ट्रेंड (Viral Tea Unique Brewing Trend)
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे, जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये चहा तयार करण्याची पद्धत नेहमीच्या पद्धतीपेक्षा अगदी वेगळी दिसत आहे. यामुळेच अनेक जण ही नवीन पद्धत आपल्या घरातही वापरून पाहत आहेत आणि चहाच्या या अनोख्या चवीचा आस्वाद घेत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने चहाचे साहित्य एकत्र केले जात आहे, ते खरोखरच पाहण्यासारखे आहे.
(नक्की वाचा: Lungs Recovery: सिगारेट सोडल्यानंतर फुफ्फुसे कधी नॉर्मल होतात? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून पायाखालची जमीन सरकेल)
व्हिडीओमध्ये दिसतंय की, सर्वात आधी गॅसवर एक भांडे ठेवले जाते. भांडे गरम होताच त्यात आधी साखर आणि नंतर चहा पावडर टाकून ती एकत्र केली जाते. त्यानंतर त्यात पाणी मिसळले जाते. त्यानंतर ठेचलेले आले आणि वेलची घातली जाते. चहाला चांगली उकळी आल्यानंतर त्यात दूध ओतले जाते. अशा प्रकारे तयार केली जातेय 'जरा हटके' चहा.
पाहा व्हिडीओ
चहा तयार करण्याची हटके पद्धत
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिला आणि शेअर केला जात आहे. चहाचे शौकीन असलेले लोक या नव्या ट्रेंडचे भरभरून कौतुक करत आहेत.