Blue Egg Viral Video: नशिबाने दिले निळे अंडे तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्हाला रस्त्यावर एखादे मोठे, चमकदार निळे अंडे सापडले तर तुम्ही काय कराल? ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी येथील एका तरुण जोडप्याने असेच एक पाऊल उचलले. त्यांना झुडपांमध्ये एक रहस्यमय निळे अंडे (Blue Egg) दिसले. ते अंडे सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा 10 पट मोठे होते आणि त्याची चमक डोळे दीपवणारी होती. हे अनोखे अंडे पाहून त्यांनी ते घरी आणण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यातून चक्क एक महाकाय पक्षी (Big Bird) बाहेर येणार आहे.
इमू झाला फॅमिली मेंबर! या जोडप्याने अंड्याची खूप काळजी घेतली. त्यांनी एका मशीनमध्ये (37°C तापमान आणि 50% आर्द्रता) त्याला तब्बल 50 दिवस जपले. 50 दिवसांनंतर जेव्हा अंडे फुटले, तेव्हा त्यातून ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्षी 'इमू' (Emu) बाहेर आला. हा पक्षी शहामृगासारखा दिसतो आणि तो खूप उंच वाढू शकतो. जसजसा इमू मोठा होत गेला, तसतसा तो या जोडप्याच्या घरात पूर्णपणे रुळला. तो त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्याप्रमाणे खेळू लागला, मजा करू लागला. व्हिडिओमध्ये एमूचे हे प्रेमळ रूप पाहून लोकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
करोडो व्ह्यूजसह व्हिडिओ व्हायरल या जोडप्याने आपल्या इमूसोबतच्या प्रवासाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. @019_editss नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत कोट्यवधी (Millions) व्ह्यूज मिळाले आहेत. 'इतका गोड व्हिडिओ कधी पाहिला नाही,' अशा कमेंट्स करत लोक जोडप्याचे कौतुक करत आहेत. ही गोष्ट फक्त एका पक्ष्याची नाही, तर निखळ प्रेम आणि माणूसकीची आहे.