- एका व्हिडीओमध्ये शिक्षिकेचा पती तिला ओयो हॉटेलमध्ये शिक्षकासोबत असल्याच्या आरोपावर भर रस्त्यात मारहाण करतोय
- व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनी या घटनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
- रस्त्यावर सुरू झालेल्या हाय होल्टेज ड्रामाला बघण्यासाठी लोक मोठ्या संख्येने थांबले होते
सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओची चर्चाही त्यात पद्धतीने होते. पण काही व्हिडीओ लोकांना विचार करायला भाग पाडत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका शिक्षिकेचा तिच्या पतीने भर रस्त्यात चांगलाच समाचार घेतला. कारण ती शिक्षिका आपल्या शाळेतील सीनियर शिक्षकासोबत एका 'OYO' हॉटेलमध्ये गेली होती. नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यात हाय होल्टेज ड्रामा सुरू झाला. त्याने पत्नीला केलेल्या प्रकाराचा जाब विचारला. येवढेच नाही तर त्याने तिला मारहाण ही केली. ही घटना एक व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. तोच व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काय घडले?
@M__Rkhan नावाच्या अकाउंटवरून X वर शेअर झालेल्या या व्हिडीओत पती-पत्नीचे भांडण गाडीच्या बाजूला सुरू असल्याचे दिसते. पती रागाने बायकोला ओरडताना आणि मारहाण करताना दिसतोय. तो वारंवार बायकोला विचारतो, "तुला बिलकुल लाज वाटली नाही? OYO हॉटेलमध्ये गेली होतीस!" पत्नी शांत उभी राहते, तर पती तिच्यावर सीनियर शिक्षकासोबत हॉटेलमध्ये असल्याचा आरोप करतो. मी सर्व पाहीलं आहे. मला सर्व माहित आहे असं ही तो या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
रस्त्यावरच हाय होल्टेज ड्रामा
रस्त्यावरून जाणारे लोक हा तमाशा पाहण्यासाठी थांबले होते. ते हा सर्व तमाशा जणू एन्जॉय करत होते. त्यांना रोखण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही. उलट काहींनी ही सर्व घटना मोबाईलमध्ये शूट केली. भांडण सुरूच होतं. त्यामुळे तिथे गोंधळ वाढत गेला. हा गोंधळ वाढल्यामुळे काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला. पतीने पत्नीला मारहाण केल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
लोकांचा संताप आणि चर्चा
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काही लोकांनी पतीच्या बाजूने बोलत म्हटले की, फसवणूक झाल्यावर कोणालाही राग येईल. तर काहींनी 'शिक्षक असे वागत असतील तर मुलांना काय शिकवणार?' असा सवाल केला आहे. काही युजर्सनी रस्त्यावर भांडणे आणि मारहाण करणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. तर काहींनी गंमत म्हणून लिहिले की 'OYO वाल्यांचे पुन्हा फ्री प्रमोशन झाले.' लोकांनी या वैयक्तिक प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.