Viral Video: सध्या सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहिले नाही. सोशल मीडियावर समाजात घडणाऱ्या अनेक घटनांबाबत माहिती आणि नवनव्या गोष्टी शिकायला, पाहायला मिळतात. इंटरनेटवर अनेक तरुण तरुणी आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव, सुख,दुःख नेटकऱ्यांशी शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे, ज्यामधील तरुणीने लग्नापासून वाचण्यासाठी कशी हटके आयडिया शोधली याची खास स्टोरी सांगितली आहे.
लग्नासाठी दबाव, तरुणीला टक्कल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील तरुणीच्या पाठीमागे लग्नासाठी दबाव होता. तिच्या घरचे तिला वारंवार लग्नाचा तगादा लावत होते, या त्रासाला कंटाळून तिने थेट आपल्या डोक्यावरील केस कापले म्हणजेच मुंडन केले. माझं ही माझ्या केसांवर तितकेच प्रेम होते,जसं सर्व मुलींचं असते. पण मी मुंडन केले, कारण माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. हा समाज, बाकीचे लोक मला जगून देणार नाहीत. माझ्यावर इतका दबाव का आहे. माझे माझ्या केसांवर प्रेम होते, मात्र समाजातील लोकांमुळे मला केस कापावे लागले, असं ती तरुणी सांगते.
Navi Panvel News: सोसायटीच्या बैठकीत राडा! अध्यक्षाच्या मुलाकडून रहिवाशांना बेदम मारहाण
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
हा व्हिडिओ @kajals_move_ या अकाउंटने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, महिलेने स्पष्ट केले आहे की तिला तिचे लांब केस खूप आवडतात, परंतु तिचे कुटुंब आणि समाज तिला लग्नासाठी सतत दबाव टाकत होते. या सततच्या दबावामुळे तिला मानसिक त्रास होत होता. शेवटी, तिने असे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे ती लग्नासाठी तयार नाही असा स्पष्ट संदेश जाईल.
तिने सांगितले की, एखादा पुरूष केस कापतो किंवा स्वतःच्या मर्जीने आयुष्याचा निर्णय घेतो तर लोक ते सामान्य मानतात. पण जेव्हा एखादी महिला असेच करते तेव्हा लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहतात, वाईट बोलतात. तरुणीच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी कमेंट करत महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
Palghar News: महिला दिनीच गर्भवतीचे हाल, शासकीय रुग्णालयात प्रवेश नाकारला; प्रसुतीसाठी रात्रभर धावपळ