दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का

धुक्यातून सुखरूप प्रवास कसा करायचा? याबाबतचा एक जुगाडाचा जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. थंडी आणि धुक्यात गाडी चालवण्याचा भन्नाट उपाय या व्हिडीओत पाहू शकता. 

जाहिरात
Read Time: 2 mins
How To Escape Accident From Fog

Car Drive In The Fog Jugaad Video : अनेकदा रस्त्यांवर धुक्याची चादर इतकी पसरते की,गाडी चालवणे कठीण होतं. विशेषत: थंडीच्या दिवसात अपघाताचा मोठा धोका असतो. पण धुक्यातून सुखरूप प्रवास कसा करायचा? याबाबतचा एक जुगाडाचा जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. थंडी आणि धुक्यात गाडी चालवण्याचा भन्नाट उपाय या व्हिडीओत पाहू शकता. 

या व्हिडिओमध्ये कारचा सीन आहे,ज्यात गाडी चालवताना डॅशबोर्डवर मोबाइल ठेवलेला आहे.त्या मोबाईलवर व्हिडिओ ऑन आहे आणि समोरच्या रस्त्याचं पूर्ण दृश्य दिसत आहे.जे दाट धुक्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं.या व्हिडिओमध्ये तुम्हाला धुक्याचा अनोखा उपाय पाहायला मिळेल.या जुगाडामुळे तुम्हाला पुढचं दिसतं,पण मागच्या बाजूचं दिसत नाही. मागे चालणाऱ्या वाहनांना देखील या जुगाडाशिवाय काहीच दिसत नाही. त्यामुळे कमेंट करणारे म्हणत आहेत की, मागच्यांना तर तुम्ही दिसणारच नाही.

नक्की वाचा >> Pune News: 1 रात्रीत असं काय घडलं, थेट घटस्फोट घेणं भाग पडलं! पुण्यात 24 तासांतच डॉक्टर पती-पत्नीचा DIVORCE

धुक्यात कार चालवताना काय काळजी घ्याल?

  • वेग कमी ठेवा
  • धुक्यात दृश्यता कमी असते, त्यामुळे गाडीचा वेग कमी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अचानक ब्रेक लागल्यास अपघात टाळता येतो.
  • लो बीम हेडलाईट वापरा
  • हाय बीम वापरल्यास प्रकाश धुक्यात परावर्तित होतो आणि दृश्यता आणखी कमी होते. त्यामुळे लो बीम हेडलाईट किंवा फॉग लॅम्प वापरा.
  • फॉग लॅम्प ऑन करा
  • जर गाडीत फॉग लॅम्प असतील तर ते नक्की चालू ठेवा. हे धुक्यात रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतात.
  •  डिफॉगर आणि वायपर वापरा

नक्की वाचा >> "मॅडम मर्डर झालाय...",पॉडकास्ट सुरु असतानाच धक्कादायक कॉल, ती महिला पोलीस अधिकारी कोण? Video व्हायरल

  • धुक्यामुळे काचांवर ओलावा जमा होतो. डिफॉगर आणि वायपर वापरून काच स्वच्छ ठेवा.
  • सुरक्षित अंतर ठेवा
  • समोरच्या वाहनापासून नेहमी जास्त अंतर ठेवा. अचानक ब्रेक लागल्यास वेळ मिळतो.
  • इंडिकेटर आणि हॅझर्ड लाइट वापरा
  • लेन बदलताना इंडिकेटर वापरा आणि जर दृश्यता खूपच कमी असेल तर हॅझर्ड लाइट ऑन करा.
  • मोबाइल किंवा व्हिडिओवर अवलंबून राहू नका
  • इंस्टाग्रामवरील जुगाड आकर्षक वाटतो, पण तो सुरक्षित नाही. नेहमी रस्त्यावर लक्ष केंद्रित करा.