Female Police Officer Video Viral : सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी महिला पोलीस अधिकारी पॉडकास्टच्या दरम्यान अचानक उठून निघून जाते. यामागचं कारण ऐकताच अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, ASP शेहरबानो नक्वी यांना स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) यांचा फोन येतो. "मॅडम, खून झाला आहे", अशी माहिती एसएचओ या महिला पोलीस अधिकाऱ्याला देतो. त्यानंतर नक्वी पॉडकास्ट मध्येच सोडून तातडीनं निघून जातात. त्यांचा हा व्हिडीओ आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.
ही व्हायरल क्लिप एका पॉडकास्टच्या रेकॉर्डिंगदरम्यानची आहे. पॉडकास्ट सुरू असतानाच ASP शेहरबानो नक्वी यांचा फोन वाजतो. कॉल उचलताच त्यांना धक्का बसतो. त्या समोरच्या व्यक्तीला विचारतात, "काय झालं?" त्यानंतर SHO त्यांना एका खूनाच्या प्रकरणाची माहिती देतो. ही माहिती ऐकून त्या तात्काळ रेकॉर्डिंग थांबवतात आणि तिथून निघून जातात. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियाांचा वर्षाव करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
ASP शेहरबानो नक्वी यांचं भरभरून कौतुक केलं
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सने ASP शेहरबानो नक्वी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. लोकांचं म्हणणे आहे की, हाच खऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा खरा चेहरा आहे. जे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असो, पण प्रथम प्राधान्य ड्युटीलाच देतात. एका यूजरने म्हटलंय, "पॉडकास्ट नंतरही होऊ शकतो, पण खूनाच्या प्रकरणाला तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे." अन्य एकाने म्हटलं, "मॅडमनी सिद्ध केले की कामापेक्षा मोठे काहीच नाही."
नक्की वाचा >> Jalgaon News : जळगाव हादरलं! चौथी मुलगी झाली म्हणून निर्दयी बापाने 3 दिवसांच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
या व्हिडीओमुळं इंटरनेटवर उलटसुलट चर्चा
दरम्यान या व्हायरल व्हिडीओमुळं इंटरनेटवर उलटसुलट चर्चाही सुरु झाली आहे. पोलीस अधिकारी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर येणे योग्य आहे का? आणि जर येत असतील तर त्यांनी ऑन-ड्युटी राहावे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ASP शेहरबानो नक्वी यांचा हा व्हिडिओ काही सेकंदांचा जरी असला, तरी तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world