बायको ओरडत होती, पण नवऱ्यानं ऐकलं नाही...बाईकला बांधून फरफटत नेलं ! Video Viral

Nagaur Video Viral : नवऱ्यानं शिक्षा म्हणून बायकोला बाईकला बांधलं आणि लांबपर्यंत फरफट नेलं.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Nagaur Video Viral: नवरा बायकोचं नातं हे जगातल्या पवित्र नात्यांपैकी एक आहे. लग्नाच्या संस्कारानंतर दोन जण एकत्रित त्यांचं आयुष्य सुरु करतात. सुख, दु:ख, आनंद, निराशा या सर्व चढ-उतारामध्ये परस्परांना सोबत करतात. परस्परांची शक्ती बनतात. पण, या पवित्र नात्याला कलंक फासणारे कमी नाहीत. अशीच एक घटना नुकतीच उघड झालीय. त्यामध्य़े नवऱ्यानं त्याच्या बायकोला बाईकला बांधून दूरपर्यंत फरफटत नेलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातल्या पांचौडी गावातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी नवऱ्या विरुद्ध कारवाई करत त्याला अटक केलीय. तसंच या प्रकरणाचा पुढचा तपास सुरु केलाय.  

बाईकला बांधून फरफटत नेलं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पांचौडी गावताल्या प्रेम राम मेघवालचं 10 महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये लग्न झालं होतं. तो लग्नानंतर पत्नीला मारहणार करत असे. त्याच्या पत्नीला एक महिन्यांपूर्वी बाडमेरमध्ये तिच्या बहिणीच्या घरी एका कार्यक्रमाला जायंच होतं. पत्नीनं त्यासाठी बराच आग्रह केला, पण तिच्या नवऱ्यानं परवानगी नाकारली. नवऱ्यानं मनाई करुनही पत्नी बहिणीकडं निघून गेली.

पत्नीनं न ऐकल्य़ानं नाराज झालेल्या नवऱ्यानं पत्नीला मोटारसायकलला बांधलं आणि रस्त्यानं फरफटत नेलं. संतापजनक गोष्ट म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला विरोध केला नाही. त्यांनी व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ जवळपास 1 महिना जुना असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेम रामला दारुचं व्यसन आहे, अशी माहितीही समोर आलीय. 

Advertisement

( नक्की वाचा : Only Fan Page मुळे चर्चा, मेडल जिंकताच Video व्हायरल! कोण आहे ती खेळाडू? )
 

पोलिसांनी केली कारवाई

नागौरचे जिल्हा पोलीस अधिक्षक नारायण सिंह टोगस यांनी सांगितलं की, 'सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण नागौर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यानंतर तत्परता दाखवत प्रेम रामला अटक केली आहे.
 

Topics mentioned in this article