एका तरुणाचं एकाच वेळी दोन जणींवर प्रेम असण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांच्या संसारात वादळ निर्माण होतं. काही वेळा हे प्रकरण पोलिसांमध्येही पोहोचते. असंच एका अजब प्रेमाच्या त्रिकोणाचं उदाहरण समोर आलंय. या प्रकरणात महिलेला तिचा नवरा तृतीयपंथीयासोबत शेअर करण्याचा तोडगा मान्य करावा लागला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मऊमधील हे उदाहरण आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोपागंज भागातील काछीकला गावात शनिवारी रात्री तृतीयपंथीयांनी जोरदार गोंधळ घातला. ते सर्व एका तरुणाच्या लग्नावर नाराज होते. त्याला आमच्या ताब्यात द्यावं अशी त्यांची मागणी होती. ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण त्यानंतरही तृतीयपंथीय त्या तरुणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडण्यास तयार नव्हते.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार काछीकलामधील एका तरुणाचं 2010 पासून गाझीपूरमधील रोशनी नावाच्या तृतीयपंथीयासोबत प्रेम होतं. तृतीयपंथीयांनी या तरुणाला अनेकदा मदत केली. या काळातील अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील त्यांच्याकडं आहत. पण, 2 वर्षांपूर्वी त्या तरुणाचं घरच्यांनी लग्न लावून दिलं. त्यानंतर तो बापही झाला. या काळात हळू-हळू त्याचं रोशनीकडं जाणं कमी झालं. तो रोशलीला टाळू लागला.
( नक्की वाचा : 2024 Dating Trends : यावर्षी तरुणांमध्ये खूप गाजले हे डेटिंग ट्रेंड्स, बदलली नात्यांची भाषा )
हा सर्व प्रकार अन्य तृतीयपंथीयांना समजला तेव्हा त्यांच्या गटानं तरुणाच्या घरी धाव घेतली. त्यांनी त्याला एका घरात कोंडलं. त्याच्या घरात जाऊन तृतीयपंथीयांचा गट गोंधळ घालत होता. हा सर्व गोंधळ पाहून एकानं 112 नंबरवर फोन करत पोलिसांना या कल्पनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दोन्ही गटांना शांत करण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला.
रोशीननं पोलिसांना तिचे तरुणासोबतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. त्या तरुणाला आपल्या सोबत नेऊ द्या अशी तिने मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा काढला. या तोडग्यानुसार तो तरुण महिन्यातील 20 दिवस पत्नीबरोबर तर 10 दिवस तृतीयपंथीयासोबत राहणार आहे.