प्रवीण देवळेकर, प्रतिनिधी
Adolf Hitler News : जगाला महायुद्धाच्या आगीत ढकलणारा आणि लाखो यहुदींचा नरसंहार करणारा जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर हा जनुकीय विकाराने त्रस्त होता, अशी धक्कादायक माहिती एका आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंट्रीमधून समोर आली आहे. हिटलरला कल्मन सिंड्रोम नावाचा दुर्मिळ जनुकीय आजार होता, ज्यामुळे तो Genetically Impotent होता, असा दावा या डॉक्यूमेंट्रीमध्ये करण्यात आलाय. हिटलर महिलांपासून लांब का राहायचे, यावर या अहवालातून नवा प्रकाश पडला आहे.
काय होता हिटलरला आजार?
आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, हिटलरला कल्मन सिंड्रोम (Kallmann Syndrome) नावाचा जनुकीय आजार होता. हा सिंड्रोम एक आनुवंशिक (Genetic) समस्या आहे, ज्यामुळे शरीरात लैंगिक हार्मोनची (Sexual Hormone) कमतरता निर्माण होते.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
कल्मन सिंड्रोम हा एक अनुवंशिक आजार आहे, ज्यामुळे शरीरात लैंगिक हार्मोनची कमतरता निर्माण होते, लैंगिक अवयवांचा पूर्ण विकास होत नाही आणि वास घेण्याची क्षमताही कमी होते. याशिवाय मूत्रपिंड, हृदय, कान आणि डोळ्यांशी संबंधित समस्याही या आजारात येऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या शारिरीक व्याधींबद्दल लोकगीते प्रचलित असली तरी, त्यांना कोणताही ठोस आधार नव्हता. मात्र, आता डीएनए चाचणीतून या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
या DNA चाचणीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, 1945 मध्ये हिटलरने बर्लिनमधील बंकरमध्ये आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह सोव्हिएत सैन्याच्या हाती लागला नाही. मात्र, हिटलरने ज्या सोफ्यावर गोळी झाडली, तिथे त्यांचे रक्त सांडले होते. याच ब्लड सॅम्पलवरून डीएनए संबंधित अनेक पुरावे हाती लागले असून, तब्बल 80 वर्षानंतर हिटलरच्या खासगी आयुष्यातील या तथ्याचा उलगडा झाला आहे. तसेच, अनेकजण हिटलरला यहुदी मानत असले तरी, डीएनए चाचणीतून तो यहुदी नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
( नक्की वाचा : Saudi Arabia Bus Accident: मक्का-मदीनामध्ये मृत्यू झाल्यास मृतदेह का परत आणता येत नाही? काय आहे नियम? )
या DNA अहवालातून तब्बल 80 वर्षांनंतर जगातील सर्वात क्रूर मानल्या गेलेल्या या नेत्याच्या खासगी आयुष्यातील तथ्यांचा उलगडा झाला आहे. त्यामुळे भविष्यात हिटलरच्या आयुष्यातील अजून कोणती सत्ये बाहेर येतात, याबद्दल जगभरातील इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.