इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलचा वर्षाव केला. जवळपास 180 बॅलेस्टिक मिसाईल इराणने इस्रायलवर डागली. इराणने प्रामुख्याने "लष्करी आणि सुरक्षा" ठिकाणांना टार्गेट केलं. यानंतर इस्रायलचा संताप शिगेला पोहोचला आहे. इराणने मिसाईल हल्ला करुन चूक केली आहे. या हल्ल्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. आम्ही वेळ आणि ठिकाण निवडू, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 180 मिसाईल डागल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. हा हल्ला एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा थोडा मोठा असेल, ज्यात इस्रायलच्या दिशेने सुमारे 110 बॅलेस्टिक मिसाईल आणि 30 क्रूझ मिसाईल डागण्यात आली होती.
(नक्की वाचा - Iran Attacks Israel Video : पश्चिम आशियातील संघर्षाला मोठं वळण, इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला)
इराणमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा
इराणने इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर लगेचच तेहरानमधील पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कारण या हल्ल्यानंतर आपल्या वाहनांना इंधनाचा तुटवडा भासणार आहे हे नागरिकांना माहीत असल्याने सर्व नागरिकांनी आपापल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. पेट्रोल पंपाभोवती गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.
(नक्की वाचा- इस्लायलचा मोठा घाव! हवाई हल्ल्यात हिसबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह ठार, IDF ची माहिती)
इराणने इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाईल डागली आहेत. त्यापैकी काही इस्रायलच्या भूभागावरही पडली आहेत. इराणचा या वर्षातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी एप्रिलमध्ये इराणने इस्त्रायलवर शेकडो मिसाईल आणि ड्रोन डागले होते. त्यावेळीही तेहरानमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
IDF ने शेअर केला नकाशा
इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने इराणच्या मिसाईल हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये इराणचे मिसाईल इस्रायलमध्ये पडताना दिसत आहेत. इराणची मिसाईल कोणत्या भागात पडली हेही इस्रायली लष्कराने नकाशाद्वारे सांगितले आहे. IDF ने दावा केला आहे की इराणच्या हल्ल्यात त्यांचे एकही नागरिक जखमी झाले नाहीत. मात्र हा हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे इस्रायलने म्हटलं आहे.