एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये आरोग्यास धोकादायक असलेल्या कीटकनाशकाचा समावेश असल्याचे आढळले. त्यामुळे या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये अन्न सुरक्षा केंद्राने (Centre For Food Safety) 5 एप्रिल रोजी घोषित केले की, चाचणीदरम्यान MDH ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाला मिश्रणांमध्ये इथिलीन ऑक्साइडचा समावेश असल्याचे आढळले. सिंगापूरनंतर आता हाँगकाँगमध्येही भारतीय मसाले ब्रँड्स एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फुड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कित्येक मसाल्यांमध्ये कथित स्वरुपात कार्सिनोजेनिक कीटनाशक एथिलीन ऑक्साइड आढळले आहे. त्यामुळे सिंगापूर व हाँगकाँगमध्ये या कंपन्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त एव्हरेस्ट ग्रुपच्या फिश करी मसालामध्येही हेच कीटनाशक आढळले आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रीसर्च ऑन कॅन्सरने एथिलीन ऑक्साइडचे ग्रुप 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकरण केले आहे. यामुळे स्तनाच्या कर्करोगासह आरोग्यास गंभीर स्वरुपातील धोके निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही परदेशामध्ये भारतीय मसाला ब्रँड्सच्या उत्पादनांवर कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा :
बापरे! या ज्वालामुखीतून बाहेर येतंय लाखोंचं सोनं, कुठे आहे ठिकाण?