रोबोट नोकऱ्या खाणार, सर्वात मोठ्या कंपनीत रोबो काम करणार; कंपनीतून 6 लाख कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी?

आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अॅमेझॉनच्या प्लानिंगमुळे कंपनी मोठी बचत करू शकेल. यातून कंपनी जवळपास एक लाख कोटींची बचत करू शकेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
न्‍यूयॉर्क:

Amazon to replace 6 lakhs workers with robots : सद्यस्थितीत तंत्रज्ञान उद्योगातील सर्व मोठ्या कंपन्या वेगाने ऑटोमेशनकडे वाटचाल करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI असो वा की ह्युमन एम्पलॉइजच्या जागी रोबोट्सचे प्रयोग असो अधिकांश संस्था आपल्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या साखळीत आता अॅमेझॉनचं नाव जोडलं गेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या हाती अशी काही कागदपत्र लागली आहेत ज्यानुसार, अॅमेझॉनने २०३३ पर्यंत अमेरिकेत सहा लाखांहून अधिक नोकऱ्यांमध्ये रोबोट्स तैनात करण्याचा प्लान तयार केला आहे. या जागांवर आतापर्यंत माणसांना नियुक्त केलं जात होतं. त्या जागांवर आता रोबोट्सची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नोकऱ्यांवर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

२०२७ पर्यंत कुणाऱ्या नोकऱ्यांवर संकट?

अॅमेझॉनच्या प्लानिंगअंतर्गत गोदाम आणि डिजिटल प्रणालीवरील माणसांवरील निर्भरता कमी करणं हा कंपनीचा हेतू आहे. ही सर्व प्रक्रिया AI आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक कुशल करण्याचा प्रयत्न आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे भविष्यात नोकऱ्यांचं स्वरुप पूर्णपणे बदलू शकतात. अॅमेझॉनच्या  कागदपत्रांनुसार, अॅमेझॉनची रोबोटिक्स टीम कंपन्याचं एकूण ऑपरेशन किमतीचा तब्बल ७५ टक्क्यांचा भाग ऑटोमेशन करण्यासाठी काम करीत आहेत. याअंतर्गत कंपनी २०२७ पर्यंत १,६०,००० नोकऱ्या संपविण्याची योजना करीत आहे.    

अरब डॉलर वाचणार...

आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अॅमेझॉनच्या प्लानिंगमुळे कंपनी मोठी बचत करू शकेल. गोदामातून स्टोअर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टवर साधारण ३० सेंट इतकी बचत करता येईल. २०२५ ते २०२७ दरम्यान या ऑटोमेशनमधून कंपनी तब्बल १२.६ बिलियन डॉलर (तब्बल १.०५ लाख कोटी) रुपयांची बचत करू शकेल. या नव्या योजनेतून अॅमेझॉन आपलं कामकाज जलद, अधिक अचूक आणि किफायतशीर बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत आहे. परंतु त्याच वेळी, भविष्यात लाखो नोकऱ्यांना असलेल्या धोक्याकडे देखील ही बाब लक्ष वेधते.

Advertisement

नक्की वाचा - EPFO : PF मधून 100 % रक्कम काढता येणार; कोणत्या कारणांसाठी पैसे काढू शकता? काय आहे नवी नियमावली?

आतापर्यंत अॅमेझॉन कंपनीची प्रतिमा जबाबदार कॉर्पोरेट कंपनी किंवा गुड कॉर्पोरेट सिटीझनची आहे. कंपनीची ही प्रतीमा कायम राखण्यासाठीही कंपनीकडून प्रयत्न केले जात आबे. हा बदल इतक्या मोठ्या स्तरांवर होणार आहे की, ज्यामुळे पाच लाखांहून अधिक नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

कंपनीने दिला नकार...

न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर अॅमेझॉनने सांगितलं की, लीक झालेल्या कागदपत्रांमधील बाब चुकीची आहे. अशा प्रकारे सहा लाखांहून अधिक नोकऱ्यांमध्ये रोबोट्स तैनात करण्यात येणार नाही. तर  येत्या काळात अडीच लाख स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे.  

Topics mentioned in this article