
EPFO Big Decision : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटमधून संपूर्ण रक्कम काढता येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढता येऊ शकत नव्हती. याशिवाय पैसे काढण्यासाठी १३ प्रश्न विचारले जात होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. नव्या बदलानुसार, तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. याचा अर्थ पैसे काढण्यासाठी आजारपण, शिक्षण आणि विवाह असे तीन विभाग करण्यात आले आहेत. याअंतर्गत तुम्ही पीएफ अकाऊंटमधून रक्कम काढू शकता.
कोणत्या कारणांसाठी पैसे काढू शकता?
शिक्षण
लग्न
आजारपण
नक्की वाचा - Check Your PF Balance: मिस कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स तपासा! 'हा' नंबर सेव्ह करून ठेवा
कोणत्या विभागासाठी किती वेळा पैसे काढता येईल?
शिक्षणासाठी दहा वेळा, लग्नासाठी पाच वेळा पीएफ अकाऊंटमधून पैसे काढता येऊ शकतील. तुम्ही यासाठी अर्ज केल्यास लगेचच मंजूर केला जाईल. काही ठराविक रक्कम काढायची असल्यास सेवा कालावधी १२ महिन्यांपर्यंत ठेवण्यात आला आहे.
पीएफ खात्यात किती रक्कम ठेवणं बंधनकारक?
तुमच्या पीएफ खात्यात किमान २५% शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. सदस्यांनी त्यांच्या खात्यात नेहमीच किमान २५% शिल्लक ठेवणे आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. निवृत्तीसाठी हे गरजेचं आहे. यावर ८.२५% व्याजदर आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world