
गाझावर इस्रायलचा हल्ला सुरूच आहे. या हल्ल्यात कतारच्या अल जजीराच्या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी गाझा शहरात इस्रायली हल्ल्यात त्यांचा एक प्रमुख रिपोर्टर अनस अल-शरीफ यांच्यासह दोन पत्रकार आणि तीन कॅमेरामन मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने एका निवेदनात अनस अल-शरीफला लक्ष्य केल्याचे मान्य केले आहे, शिवाय त्याला हमासशी संबंधित "दहशतवादी" म्हटले आहे. मृत्यू पूर्वी अनस अल-शरीफ यांच्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी काही मजकूरही लिहीला होता. तो आता चर्चेत आहेत. त्यांनी एक शेवटचे पोस्ट टाकली होती.
त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "ही माझी अंतिम इच्छा आणि वसीयत आहे. हा माझा अंतिम संदेश आहे. जर हे माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले, तर हे जाणून घ्या की इस्रायल मला मारण्यात आणि माझा आवाज बंद करण्यात यशस्वी झाला आहे. तुमच्यावर अल्लाहची शांती, दया आणि आशीर्वाद असो. अल्लाह जाणतो की, मी जबालिया शरणार्थी शिबिराच्या गल्ल्या आणि परिसरात माझ्या लोकांच्या समर्थनासाठी आणि आवाज बनण्यासाठी माझे सर्व प्रयत्न आणि शक्ती लावली." 28 वर्षांच्या या अल जजीरा पत्रकाराला आशा होती की तो अल-मजदल मधील आपल्या कुटुंबाकडे परत येईल. परंतु आपल्या मृत्यूच्या या अंतिम संदेशात त्याने लिहिले की "अल्लाहची इच्छा सर्वात वर आहे. त्याचा निर्णय अंतिम आहे".
तो म्हणाला, "मी वेदना काय असतात त्या पाहिल्या आहेत. मी वारंवार वेदना आणि नुकसानीची चव चाखली आहे. तरीही, मी सत्याला कोणताही आक्षेप किंवा विकृत न करता व्यक्त करण्यात कधीही संकोच केला नाही. जे गप्प राहिले, ज्यांनी आमची हत्या स्वीकारली आणि ज्यांनी आमचे श्वास थांबवले आणि ज्यांचे हृदय आमच्या मुलांच्या आणि महिलांच्या मृत्यूने पिघळले नाही. तसेच त्यांनी आमच्या लोकांना दीड वर्षांहून अधिक काळ सहन करावा लागत असलेल्या नरसंहाराला थांबवले नाही, त्यांच्या विरोधात अल्लाह साक्षीदार आहे." असं ही त्याने म्हटले आहे.
पत्रकाराने लोकांना आपल्या कुटुंबाची, विशेषतः आपल्या मुलीची पत्नीची आणि आईची काळजी घेण्याचे आवाहनही केले. पोस्टमध्ये म्हटले आहे, "जर मी मरण पावलो, तर मी माझ्या तत्त्वांवर दृढ राहून मरण पावलो आहे, अल्लाहसमोर साक्ष देतो की मी त्यांच्या आदेशावर समाधानी आहे. त्यांच्या भेटीसाठी इच्छुक आहे. मला खात्री आहे की अल्लाहसोबत जे आहे ते अधिक चांगले आणि चिरस्थायी आहे. गाझाला विसरू नका. आणि क्षमा आणि स्वीकृतीसाठी तुमच्या चांगल्या प्रार्थनांमध्ये मला विसरू नका." असं ही तो म्हणाला आहे.
नक्की वाचा - India - Pakistan : अरबी समुद्रात तणाव, भारत-पाकिस्तानचे नौदल आमने-सामने! इशारा जारी...
अल जजीराने सांगितले आहे की, अल-शरीफ यांच्यासोबत, अल जजीराचे पत्रकार मोहम्मद क्रेइकह आणि कॅमेरामन इब्राहिम जहीर, मोआमेन अलीवा आणि मोहम्मद नौफाल इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. तसेच हल्ल्यानंतर लगेचच, इस्रायली सैन्याने हल्ल्या केल्याचे मान्य केले आहे. अनस अल शरीफ हा तरुण पत्रकार होता. युद्ध सुरु झाल्यापासून गाझावर वेगवेगळे रिपोर्ट केले आहेत. उत्तर गाझात इस्त्रायली हल्ल्यात त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. इस्त्रायली हल्ल्यानंतरही त्याने गाझा सोडलं नाही. त्याने सातत्यानं रिपोर्टींग केलं. इस्त्रायली बाँम्ब हल्ल्यानंतरची विदारक स्थिती त्याने दाखवली. अनसचं वय अवघं 28 वर्षे होतं. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. पण अनस हमासचा सदस्य असल्याचा इस्त्रायलचा दावा होता. अनसला हमासनं रॉकेट हल्ल्यासाठी प्रशिक्षित केल्याचा आरोप होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world