Apple Watch: अ‍ॅपल वॉचने वाचवला जीव! अचानक कोसळलेल्या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

Apple Watch: अ‍ॅपल वॉचच्या 'फॉलो डिटेक्ट' या हेल्थ आणि सेफ्टी फीचरने अमेरिकेतील ओहायो येथे राहणाऱ्या मोहम्मद इस्लाम या व्यक्तीचा जीव वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा मानवी प्राणांचे रक्षण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. अमेरिकेतील ओहायो (Ohio) येथे राहणाऱ्या मोहम्मद इस्लाम नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, जर त्यांच्या मनगटावर अॅपल वॉच नसती, तर आज ते जिवंत नसले असते. अचानक प्रकृती बिघडल्याने ते जमिनीवर कोसळले असताना, त्यांच्या अॅपल वॉचने आपोआप इमर्जन्सी सेवेला कॉल करून त्यांचे प्राण वाचवले.

नक्की काय घडली होती घटना?

स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद इस्लाम यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, कानाजवळ वेदना होणे आणि चालताना त्रास होणे अशा समस्या जाणवत होत्या. घरात ते एकटेच होते. घराबारे कचरा टाकण्यासाठी गेले असता मोहम्मद अचानक खाली पडले आणि बेशुद्ध झाले.

Advertisement

जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेव्हा संपूर्ण शरीराला घाम सुटला होता आणि त्यांना उठणे शक्य होत नव्हते. एका खुर्चीचा आधार घेऊन ते कसेबसे बसले, तितक्यात त्यांना ॲम्बुलन्सच्या सायरनचा आवाज ऐकू आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या तपासात त्यांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्याचे निष्पन्न झाले. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले.

(नक्की वाचा-  लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)

अॅपल वॉचचे 'फॉलो डिटेक्ट' फीचर कसे काम करते?

अॅपल वॉचमधील 'फॉलो डिटेक्ट' फीचर हे Apple Watch SE, Series 4 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. जेव्हा वॉचला युझर जोरात खाली पडल्याचे जाणवते, तेव्हा ती मनगटावर व्हायब्रेट होते, अलार्म वाजवते आणि स्क्रीनवर "तुम्ही ठीक आहात का?" अशी विचारणा करते. जर युझरची हालचाल सुरू असेल, तर वॉच युझरच्या प्रतिसादाची वाट पाहते आणि आपोआप कॉल करत नाही.

30 सेकंदांचा काउंटडाऊन  

जर युझर सुमारे 1 मिनिटापर्यंत कोणतीही हालचाल करत नसेल, तर वॉच 30 सेकंदांचा काउंटडाऊन सुरू करते, ज्या दरम्यान अलार्मचा आवाज अत्यंत तीव्र होतो. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास, अॅपल वॉच आपोआप इमर्जन्सी सेवेला कॉल लावते, युझरचे लाइव्ह लोकेशन शेअर करते आणि नातेवाईक किंवा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना घटनेचा संदेश पाठवते.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

कोणासाठी हे फीचर बाय-डिफॉल्ट चालू असते?

अॅपलच्या नियमांनुसार, 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या युझर्ससाठी हे 'फॉलो डिटेक्ट' फीचर बाय-डिफॉल्ट ऑन असते. तर 18 ते 54 वर्षे वयादरम्यानचे युझर्स आपल्या आयफोनमधील (iPhone) 'Watch App' मध्ये जाऊन 'Emergency SOS' सेटिंग्जद्वारे हे फीचर मॅन्युअली चालू करू शकतात.
 

Advertisement

Topics mentioned in this article