ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. सरकारकडून विधेयक मंजूर करण्यात आले असून मुलांना सोशल मीडिया बंदी करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियाने गुरुवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा कायदा पारित केला आहे. या नव्या कायद्यामुळे इन्टाग्राम, फेसबुकसह टिकटॉरसारख्या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांना लॉग इन करता येणार नाही. जर कोणी लॉग इन केलं तर त्यांना 32 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 2,70,36,59,000 रुपयांना दंड ठोठवला जाईल. हा कायदा लागू करण्याच्या प्रक्रियेचं परीक्षण जानेवारी महिन्यात सुरू होईल आणि पुढील एका वर्षात बंदी लागू होईल.
नक्की वाचा - India-Canada row : कॅनडाच्या मंत्र्यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, भारतानं केली कारवाई
सोशल मीडियावरील नकारात्मकतेमुळे लहान मुलांचं मानसिक स्वास्थ बिघडत आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. या कायद्यातून युट्यूब वगळण्यात आलं आहे. शाळेतील शैक्षणिक अभ्यासासाठी युट्यूबचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
जानेवारी 2024 पासून कायदा लागू करणार..
ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडियाशी संबंधित कायदा जानेवारी 2024 मध्ये लागू करण्यात येणार आहे. वर्षभरात हा कायदा पूर्णपणे लागू होईल. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त फ्रान्स आणि काही अमेरिकन राज्यांनी पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणण्यासाठी कायदा पारित केला आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र पूर्णपणे बंदी आणून इतर देशांच्या तुलनेत अधिक कडक पाऊलं उचलली आहे. यातून मेटा, टिकटॉक आणि एक्ससारख्या कंपन्यांवर थेट परिणाम होत असल्याने या कायद्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.