जगातील वाईट घटनांची चिंता सर्वांना आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाइन युध्दामुळे भीती वाढली आहे. 7 जून 2025 ला मंगळाची चाल बदलणार आहे, ज्यामुळे बाब वेंगाची भविष्यवाणी सत्य ठरू शकते, असे मानले जात आहे.
आपलं आणि जगाचं पुढे काय होणार याची चिंता या जगातील प्रत्येक मानवाला असते. जगात काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटून अनेकांचा जीव घाबराघुबरा होत असतो. जगात होत असलेल्या विविध घडामोडींमुळे भविष्यात काय होणार याचा विचार करणं प्रत्येकाला भाग पडतंय. काही एजन्सीनी दिलेले इशारे, अंतराळ वैज्ञानिक आणि हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने अंगुलीनिर्देश करत आहेत. बुल्गारियाच्या बाबा वेंगाने केलेली एक भविष्यवाणी पाहिल्यास हे सगळे इशारे त्या भविष्यवाणीशी मिळतेजुळते वाटू लागले आहेत.
या सगळ्या गोष्टींमुळे भीती वाटण्याचे कारण काय आहे ? असा कोणी प्रश्न विचारला तर त्याला जगात सुरू असलेल्या दोन मोठ्या युद्धांचा दाखला देता येईल. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजून सुरू असून ते थांबण्याचे नाव घेत नाहीये. दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्याकही संघर्ष सुरू असून तो देखील धुमसता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्येही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, सुदैवाने हा तणाव निवळला.
नक्की वाचा :मदतीनंतर कृतज्ञता! हत्तीच्या पिल्लाने JCBचे 'असे' मानले आभार
मंगळ आपली चाल बदलतोय
आता पाहूया की चिंतेचे मूळ काय आहे. 7 जून 2025 ही तारीख अनेकांच्या मनात धडकी भरवणारी तारीख आहे. ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांनी म्हटलंय की 7 जून रोजी मंगळ आपली चाल बदलणार आहे. मंगळ हा अमंगळ करणारा ग्रह मानला जातो. मंगळामुळे युद्ध, तणाव, दुर्घटना, अग्नितांडव अशा घटना वाढीस लागतात असा दावा केला जातो. मंगळाने आपली चाल बदलली म्हणजे काहीतरी मोठे आक्रित होणार अशी भीती अनेकांना वाटते आहे. थोडक्यात काय तर मंगळाने राशी बदल केल्यास तो अशुभ संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच बाबा वेंगाने केलेल्या एका भविष्यवाणीने चिंतेत भर पाडली आहे. मंगळाचा राशी बदल आणि बाबा वेंगाची भविष्यवाणी हे दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवत आहे, ते म्हणजे 'काहीतरी भयंकर घडणार आहे.'
कोण आहे बाबा वेंगा?
बुल्गारियामध्ये 1911 मध्ये जन्मलेल्या वेंगा हिने बालपणीच दृष्टी गमावली होती. असे म्हटले जाते की, तिची दृष्टी गेली मात्र तिला भविष्यात होणाऱ्या गोष्टी दिसू लागल्या. बाबा वेंगा ही अत्यंत गूढ होती. तिने पुढच्या अनेक वर्षांनंतर घडणाऱ्या घटनांबद्दल फार पूर्वीच सांगून ठेवले होते. असा दावा केला जातो की यातील बहुतांशी भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या. यापैकी काही भविष्यवाण्या इतक्या अचूक ठरल्या की जगभरातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनाही त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला होता. बाबा वेंगा हिने मोठ्या नैसर्गिक आपत्ती,राजकीय उलथापालथ, युद्धे याबद्दलची भाकिते वर्तवली होती. 1996 साली बाबा वेंगाचे निधन झाले होते. तिच्या मृत्यूच्या अनेक वर्षानंतरही तिने केलेल्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा होत असते.
नक्की वाचा :खऱ्या प्रेमासाठी फुटबॉलपटूनं झिडकारलं राजकुमारीचं स्थळ?
7 जून 2025 नंतर काय घडणार ?
ज्योतिष्यांच्या मते 7 जून 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे कारण या दिवशी ग्रहांचा सेनापति मानला जाणारा मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा, धैर्य, क्रोध आणि युद्धाचे कारक मानले जाते. तर सिंह राशी ही नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचे प्रतीक मानले जाते. जेव्हा मंगळ सिंह राशीत गोचर करतो, तेव्हा याचा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. तज्ज्ञांचे मत आहे की मंगळाच्या सिंह राशीतील गोचरामुळे जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळू शकतात. हे पडसाद कसे असतील याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बाबा वेंगाची भविष्यवाणी काय होती ?
बाबा वेंगाने म्हटले होते की 2025 मध्ये किंवा त्यानंतर जग दोन भागात विभागले जाईल. एका हिश्श्यात तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली संस्कृती असेल आणि दुसऱ्या हिश्श्यात आध्यात्मात गुंगलेली संस्कृती असेल. दक्षिण गोलार्धात मोठा स्फोट होईल किंवा अशी काहीतरी घटना घडेल ज्यामुळे जमिनीतून येणारा धूर आकाशात पसरलेला पाहून अनेकांच्या मनात धडकी भरेल. जून 2025 नंतर दूषित पाण्यातील विषाणू अथवा बुरशी या साथीच्या रोगांचे कारण ठरू शकतील.
पूर्वेकडचा तो देश भारत असेल ?
बाबा वेंगा हिने एक भविष्यवाणी केली होती, तिने म्हटले होते की, "पूर्वेकडील एक देश आपल्या आध्यात्मिक शक्तीने पश्चिमेकडील देशांनी निर्माण केलेली आव्हाने थांबवण्याचा प्रयत्न करेल." तिची ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर हा देश कोणता असावा असा सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा देश आपला भारत देश असावा असा अंदाज वर्तवला जात आहे कारण भारत हा अनेक शतके आध्यात्मिक शक्तीचे केंद्रस्थान राहिला आहे. योग, ध्यान यामुळे भारताच्या आध्यात्मिक शक्तिची प्रचिती सगळ्या जगाला आलेली आहे.