जाहिरात

खऱ्या प्रेमासाठी फुटबॉलपटूनं झिडकारलं राजकुमारीचं स्थळ? इंटरनेटवर गोंधळ उडवणाऱ्या घटनेचं जाणून घ्या सत्य

Footballer Gavi Princess Leonor Story : अनेक सोशल मीडिया पोस्टवरील दाव्यानुसार  राजकन्या लिओनोरला गावी पसंत होता. पण, गावीने त्याच्या प्रेयसीसाठी राजकन्येचे प्रेम नाकारले.

खऱ्या प्रेमासाठी फुटबॉलपटूनं झिडकारलं राजकुमारीचं स्थळ? इंटरनेटवर गोंधळ उडवणाऱ्या घटनेचं जाणून घ्या सत्य
मुंबई:

Footballer Gavi Princess Leonor Story : तुम्ही फुटबॉल फॅन असाल तर फुटबॉलपटू गावी ( Spain football star Gavi) तुम्हाला नक्कीच माहिती असेल. स्पेनच्या या फुटबॉलपटूचे जगभर फॅन्स आहेत. पण, सध्या त्याच्या खास फॅनची चर्चा सुरू आहे, जी सामान्य नसून राजकन्या आहे. स्पेनची सुंदर राजकन्या लिओनोर (Spain's Princess Leonor ) देखील गावीची जबरा फॅन बनलीय. त्यामुळेच त्यांच्याशी संबंधित एक बातमी सध्या खूप चर्चेत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

अनेक सोशल मीडिया पोस्टवरील दाव्यानुसार  राजकन्या लिओनोरला गावी पसंत होता. पण, गावीने त्याच्या प्रेयसीसाठी राजकन्येचे प्रेम नाकारले. काही दिवसांपूर्वी गावी त्याची गर्लफ्रेंड एना पेलायोसोबत एकत्र दिसला. त्यानंतर या चर्चेनं जोर धरला. यापूर्वी 2022 मध्ये ही चर्चा जोरात होती. त्यावेळी कथितरित्या राजा फेलिप VI यांनी गावीला एका लहान आकाराच्या जर्सीवर स्वाक्षरी करण्यास सांगितले, जी राजकन्येसाठी असल्याचे मानले जात होते.

15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड?

( नक्की वाचा :  15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )

कधी झाली सुरुवात?

गावी आणि लिओनोर यांच्यातील रोमान्सच्या चर्चा 2022 मध्ये सुरु झाल्या. त्यावेळी किंग फेलिप यांनी कतारमधील फिफा विश्वचषक दरम्यान स्पेनच्या कोस्टा रिकावर 7-0 अशा  विजयानंतर गावीकडून एक स्वाक्षरी केलेली जर्सी घेतली. ही जर्सी लहान आकाराची होती, जी लिओनोरसाठी होती असे म्हटले जात होते. स्पॅनिश मीडिया आउटलेट्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, लिओनोर बार्सिलोनाची प्रशंसक आहे आणि तिला गावीवर क्रश आहे. इतकेच नाही तर गावीचे फोटो तिच्या स्कूल फोल्डरमध्ये होते, अशीही माहिती समोर आली. 

त्यानंतर 2024 मध्ये स्पेननं युरो कप जिंकल्यानंतर  झारझुएला पॅलेसमध्ये आयोजित समारंभात लिओनोर आणि गावीचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये लिओनोर गावीशी हात मिळवताना हसत होती. बस, मग काय, या क्षणाने या चर्चांवर शिक्कामोर्तबच झाल्याचा दावा सुरु झाला. तेव्हा काही टॅब्लॉइड्सनी दावा केला की, लिओनोर आणि गावी अनेक वर्षांपासून डेटिंग करत आहेत. राजकन्या लिओनोर गावीला पसंत करत होती, असाही दावा त्यांनी केला.

फ्रान्सच्या अध्यक्षांना पत्नीनं खरंच थोबाडीत मारली? जगभरात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण

( नक्की वाचा :  फ्रान्सच्या अध्यक्षांना पत्नीनं खरंच थोबाडीत मारली? जगभरात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण )

गावी आणि लिओनोर कोण आहेत?

 गावीचा जन्म 5 ऑगस्ट 2003 रोजी झाला. तो सध्या स्पेनमधील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू आहे. तो बार्सिलोना आणि स्पेनचा मिडफिल्डर आहे. त्यानं 2022 साली गोल्डन बॉय अवॉर्ड आणि कोपा ट्रॉफी जिंकली. जगातील तरुण आणि प्रतिभावान फुटबॉलपटूमध्ये त्याचा समावेश होतो. उत्कृष्ट फुटबॉल कौशल्यामुळे त्याची लोकप्रियता सातत्यानं वाढत आहे. 

राजकन्या लिओनोर: 31 ऑक्टोबर 2005 रोजी जन्माला आलेल्या लिओनोर स्पेनचे राजा फेलिप VI आणि राणी लेटिझिया यांची मोठी कन्या आहेत. त्या स्पेनच्या सिंहासनाच्या उत्तराधिकारी (हेयर प्रिजम्प्टिव्ह) देखील आहेत. त्यांना प्रिंसेस ऑफ अस्टुरियस असेही म्हटले जाते. लिओनोरने त्यांचे शिक्षण युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) अटलांटिक, वेल्स येथून पूर्ण केले आणि सध्या जनरल मिलिट्री अकॅडमीमध्ये तीन वर्षांचे सैन्य प्रशिक्षण घेत आहेत.

काय आहे सत्य?

गावी आणि लिओनोर यांच्यात रोमँटिक संबंधांची गोष्ट इंटरनेटच्या जगात फिरत असली तरी, याला कोणतेही ठोस पुरावे नाहीत. रॉयल फॅमिली न्यूज आणि स्पॅनिश मीडिया यांसारख्या अनेक विश्वसनीय स्रोतांनीही या अफवांना निरर्थक म्हटले आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे, लिओनोरने कधीही गावीसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. शाही कुटुंबानेही या अफवांवर कोणतेही अधिकृत विधान दिले नाही. 

काही मीडिया आउटलेट्सनी दावा केला की, गावीने लिओनोरचे प्रेम नाकारले, कारण त्यांना आपल्या फुटबॉल करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. पण ही देखील एक अफवाच आहे, कारण लिओनोरकडून असा कोणताही प्रस्ताव समोर आला नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com