जाहिरात

Baba Vanga: बाबा वेंगांची जुलै महिन्यातील भविष्यवाणी!, त्या भाग्यवान लोकांमध्ये तुम्ही आहात का?

अवघ्या 12 वर्षांच्या असताना त्यांची दृष्टी गेली होती. तरीही त्यांनी जगातील महत्त्वाच्या घटनांबद्दल खूप आधीच भविष्यवाण्या केल्या.

Baba Vanga: बाबा वेंगांची जुलै महिन्यातील भविष्यवाणी!, त्या भाग्यवान लोकांमध्ये तुम्ही आहात का?

फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमस (Nostradamus) बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आपल्या कवितांमधून भविष्यवाण्या (Nostradamus predictions) करणारे नॉस्ट्राडॅमस यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. त्यांच्याप्रमाणेच बल्गेरियामध्ये एक प्रसिद्ध भविष्यवेत्ता होऊन गेली, ज्यांना लोक बाबा वेंगा (Baba Vanga) म्हणून ओळखतात. त्यांना 'बाल्कनची नॉस्ट्राडॅमस' असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू होऊन 29  वर्षे झाली आहेत. पण त्यांच्या अनेक भविष्यवाण्या (Baba Vanga Predictions) खऱ्या ठरत आहेत. याच कारणामुळे लाखो लोकांचा त्यांच्यावर आजही विश्वास कायम आहे.

जुलै 2025 साठीही त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. ज्यानुसार, जुलै महिना मेष (Aries), तूळ (Libra), सिंह (Leo) आणि धनु (Sagittarius) राशीच्या लोकांसाठी जबरदस्त सौभाग्यशाली ठरू शकतो. हा महिना अर्ध्याहून अधिक गेला आहे. पण अजूनही जर या राशीच्या लोकांसाठी भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या नसतील, तर उरलेल्या दिवसांमध्ये शक्यता अजूनही कायम आहे. जर त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, तर या राशीच्या लोकांच्या जीवनात करिअर, नातेसंबंध, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये जबरदस्त बदल दिसून येऊ शकतात.

नक्की वाचा - Crime News: दीरासोबत प्रेमसंबध, नवऱ्याचा अडथळा, इंस्टाग्रामवर रचला थरकाप उडवणार हत्येचा कट

मेष (Aries): करिअरमध्ये प्रगती
मेष राशीच्या लोकांसाठी, या महिन्यात सौभाग्यात समृद्धी येईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगांनी केली आहे. शिवाय त्यांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल असं ही त्यांनी म्हटलं आहे. हा महिना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती घडवून आणू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसारही ही वेळ कोणत्याही संकोचाशिवाय बदल स्वीकारण्यासाठी आणि नवीन संधींचा पाठलाग करण्यासाठी योग्य आहे असं ही त्यांनी म्हटलं आहे. 

तूळ (Libra): प्रेमात अनुकूल काळ
तूळ राशीचे लोक या महिन्यात, आर्थिक स्थिरता आणि भावनिक वाढीची अपेक्षा करू शकतात. वैयक्तिक किंवा व्यावसायिक स्तरावर नवीन नातेसंबंध फुलण्याची शक्यता आहे. सध्याचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी अनुकूल वेळ दिसत आहे.

सिंह (Leo): ओळख आणि प्रतिष्ठा
सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात ओळख आणि प्रतिष्ठा मिळू शकते. वाढलेल्या ऊर्जा आणि आकर्षणासह नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी आणि धाडसी पाऊले उचलण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाऊ शकते. त्यांच्यासाठी, जुलै महिना कठोर परिश्रमाचे फळ देणारा महिना ठरू शकतो.

धनु (Sagittarius):

अनेक शक्यतांनी भरलेला धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना, साहस आणि आंतरिक विस्ताराकडे निर्देश करतो. मग ती यात्रा असो, आध्यात्मिक जागृती असो किंवा नवीन गोष्टी शिकणे असो, हा महिना शक्यता निर्माण करण्याची संधी निर्माण करतो. यामध्ये अपारंपरिक पद्धतींनी वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाची शक्यता निर्माण होत आहे.

नक्की वाचा - Exclusive : अख्खं गाव रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात काय घडलं?

अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या!
बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वांगेलिया पांदेवा गुस्त्रेवा यांचा जन्म बल्गेरियातील स्त्रुमिका येथे 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला होता. त्यावेळी बल्गेरिया ऑस्मानी सल्तनतचा भाग होता. अवघ्या 12 वर्षांच्या असताना त्यांची दृष्टी गेली होती. तरीही त्यांनी जगातील महत्त्वाच्या घटनांबद्दल खूप आधीच भविष्यवाण्या केल्या. त्यापैकी अनेक खऱ्या ठरल्या. उदाहरणार्थ, अमेरिकेतील 9/11 चे दहशतवादी हल्ले. फुकुशिमा अपघात. राजकुमारी डायना यांचा मृत्यू. ISIS सारख्या दहशतवादी संघटनांची निर्मिती यांसारख्या घटनांबद्दल त्यांनी आधीच सांगितले होते. रशियाचे कम्युनिस्ट नेते स्टालिन यांच्या मृत्यूची तारीखही त्यांनी आधीच सांगितली होती. ती खरी ठरली आहे. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मागे भविष्यवाण्यांचा एक वारसा सोडला आहे, जो जगभरातील लोकांना आजही आकर्षित करत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com