Baba Vanga : बाबा वेंगाची भयानक भविष्यवाणी, जुलै 2025 मध्ये निसर्गाचा प्रकोप होणार?

Viral Prediction 2025: बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये मोठी त्सुनामी येईल असं भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जुलै 2025 मध्ये एक मोठी त्सुनामी येईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tsunami Bhavishyavani: बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची अनेक भाकिते आजवर खरी झाली आहेत. त्याच्या भविष्यवाण्या समोर आल्या की लोकांमध्ये आता घबराट पसरते. इंदिरा गांधींच्या हत्येपासून ते अनेक नैसर्गिक आपत्तींपर्यंत त्यांची अनेक भाकीतं खरी ठरली आहेत. त्यांनी पाण्याबद्दलही भाकीतही केले आहे. त्यानुसार पुढील 145 वर्षांत म्हणजे 2170 मध्ये पृथ्वीवरील पाणी सुकू लागेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये मोठी त्सुनामी येईल असं भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जुलै 2025 मध्ये एक मोठी त्सुनामी येईल. जपानच्या समुद्रातील पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होईल आणि उद्रेकानंतर मोठी त्सुनामी येण्याची भविष्यवाणी केली आहे. 

वृत्तानुसार, बाबा वेंगांनी जपान, तैवान, इंडोनेशिया आणि उत्तर मारियाना बेटांवर मोठ्या प्रमाणात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. मानवी निष्काळजीपणा आणि हवामान बदलाचा हा परिणाम असेल.

(नक्की वाचा- Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!)

2025 मध्ये येणारी ही त्सुनामी 2011 च्या त्सुनामीपेक्षाही भयानक असेल. जास्त विनाशकारी असेल. ही भविष्यवाणी व्हायरल होताच, सोशल मीडियावर मीम्सपासून ते गंभीर चर्चा होत आहेत. काही लोक याला भीतीदायक म्हणत आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा- Cidco News: सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?)

1999 मध्ये जपानी बाबा वेंगा यांनी केलेली भाकिते खरी ठरल्यानंतर 2011 मध्ये तिचे पुस्तक प्रसिद्ध झाले. भविष्यातील घटनांचे चित्रणही त्यांच्या पुस्तकात करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकात दाखवलेल्या अनेक घटना नंतर खऱ्या ठरल्या. साथीचे रोग, भूकंप आणि राजकीय गोंधळ अशा अनेक घटना खऱ्या ठरल्या. त्यामुळे आता त्यांच्या त्सुनामीचा इशाऱ्यामुळे लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.