BLA attack on Pakistani Army : 'ऑपरेशन सिंदूर'चा घाव ताजा असताना पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैनिकांवर दोन हल्ले केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे.
बीएलएने पाकिस्तानी लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला केला. या स्फोटात स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह सर्व 12 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्फोटात गाडीचे तुकडे झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसऱ्या एका कारवाईत, बीएलएच्या केचमधील कुलाग तिग्रान भागात पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी पथकाला लक्ष्य करण्यात आले. काल दुपारी 2.40 वाजेच्या सुमारास रिमोट-कंट्रोल्ड आयईडीचा स्फोट झाला. या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त; विध्वंसाचे सॅटलाईट Photo आले समोर)
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमधील अशांतता आणि संघर्ष दिसून येत आहे. या भागात राजकीय दुर्लक्ष, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि पाकिस्तानी राज्याकडून नैसर्गिक संसाधनांचे शोषण या कारणांमुळे फुटीरतावादी गटांनी स्वातंत्र्याची मागणी केली आहे.
(नक्की वाचा- भारताची नारी शक्ती! सोफिया कुरैशी-व्योमिका सिंहची सोशल मीडियावर चर्चा; भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव)
या गटांचा असा युक्तिवाद आहे की या प्रदेशातील प्रचंड खनिज संपत्तीचा केंद्र सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होतो. मात्र स्थानिक समुदाय गरीब आणि अविकसित राहतात. यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढत आहे.