Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा बंडाचा वणवा, हसीनानंतर युनूस यांची सत्ताही जाणार?

Bangladesh Political Crisis : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती चिघळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bangladesh : बांगलादेशमध्ये रस्त्यावर उतरले विद्यार्थी, पुन्हा सत्तापालट होणार?
मुंबई:

Bangladesh Political Crisis : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती चिघळत आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांची राजवट समाप्त होऊन अद्याप वर्षही झालेलं नाही. त्याचवेळी बांगलादेशच्या विद्यमान सरकारच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनीच शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं होतं. याच आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं. आता विद्यार्थी पुन्हा एकदा यूनूस यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

बांगलादेशच्या घटनांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार विद्यार्थी युनूस सरकारच्या काही निर्णावर नाराज आहेत. नवीन पूर्वसंध्येला (31 डिसेंबर 2024) विद्यमान सरकारच्या विरोधात हजारो विद्यार्थी ढाकामधील सेंट्रल शहीर मिनारजवळ एकत्र आले होते.

बांगलादेशची राजधानी ढाकामधील याच ठिकाणाहून शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी बांगलादेशमध्ये धर्मांधता आणि इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी अनेक घोषणा देखील देण्यात आल्या. 

( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
 

1972 मधील संविधान रद्द करा

बांगलादेशमध्ये 1972 साली लागू करण्यात आलेलं संविधान रद्द करावं अशी मागणी आम्ही करणार असल्याटचं दं एंटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मुव्हमेंट या संघटनेनं केली आहे. विद्यार्थ्यांच्या या संघटनेनं त्याचं वर्णन मुजीबिस्ट संविधान असं केलं आहे. या संविधानामुळे भारताच्या आक्रमकतेचा रस्ता तयार केला आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या मागणीवर बांगलादेशमधील सरकार आणि विरोधी पक्ष आमने-सामने आहेत. 

Advertisement

बांगलादेशमध्ये पुन्हा आंदोलनाची तयारी

विद्यार्थी संघटनेचा पावित्रा पाहता त्या पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, असं मानलं जात आहे. युनिटी मार्चसाठी विद्यार्थी एकत्र येत आहेत. यापूर्वी झालेल्या आंदोलनात मारले गेलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील आंदोलक विद्यार्थी करत आहेत.

( नक्की वाचा : राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )
 

विद्यार्थ्यांना कुणाचा पाठिंबा?

बांगलादेशमधील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे इस्सामी संघटना जमात ए इस्लामीचा हाथ असल्याचं सांगितलं जात आहे. अब्दुल हन्नान या आंदोनाचे नेतृत्त्व करत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकारच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या दरम्यानही हन्नान बराच चर्चेत होता. 
 

Advertisement