राजकीय हलकल्लोळाच्या एक वर्षानंतर बांगलादेश किती बदललं? शेख हसीना यांच्या राजवाड्याचं पुढे काय झालं?

Bangladesh Revolution Anniversary: बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकार शेख हसीना यांच्या राजवाड्याचं एका संग्रहालयात रुपांतरित करीत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बांग्लादेश में 5 अगस्त को हसीना सरकार के तख्तापलट को 1 साल पूरे हो जाएंगे. राजनीतिक स्थिति अस्थिर बनी हुई है.
  • शेख हसीना के महल को संग्रहालय में बदला जा रहा है ताकि उनके कथित निरंकुश शासन की याद जनता के बीच बनी रहे.
  • शेख हसीना पर मानवाधिकारों के उल्लंघन और मानवता के खिलाफ अपराधों के आरोप लगे हैं, जिनके खिलाफ मुकदमे चल रहे हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Bangladesh Revolution Anniversary: 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकारला पदावरुन हटविल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षभरात बांगलादेशाची स्थिती बदलली आहे. बांगलादेशात हुकूनशाहीचा आरोप करीत शेख हसीनाला खुर्चीवरुन हटविण्यात आलं होतं. शेख हसीना यांनी जीव मुठीत धरून भारतात पळून यावं लागलं. पण आज एक वर्षानंतरही बांगलादेश अनिर्वाचित अंतरिम सरकारकडून चालवला जात आहे. बांगलादेशात कट्टरपंथींयांची ताकद वाढली आहे. येथे मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये 12 पट वाढ झाली आहे.

बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार शेख हसीना यांच्या अत्यंत सुरक्षित असलेलं निवासस्थान किंवा राजवाड्याचे संग्रहालयात रुपांतर करीत आहे. यामागे बांगलादेशातील नागरिकांना त्यांच्या कथित हुकूमशाही राजवटीची कायमची आठवण करून देणे हा उद्देश आहे.

Advertisement

हा राजवाडा ब्रिटीश आणि पाकिस्तानी शासनाच्या दरम्यान इस्टेट राजबाडीच्या नावाने ओळखला जातो. हा दिघपतियाच्या महाराजांचा राजवाडा होता. हसीना यांच्या नेतृत्वाच्या बांगलादेश सरकारचे प्रमुख (पीएम) या राजवाड्यात वास्तव्य करीत होते. 

Advertisement

शेख हसीना यांचा राजवाडा संग्रहालय रुपांतरित केलं जात आहे

5 ऑगस्ट, 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांचं सरकार पडलं होतं. हसीना यांच्या हेलिकॉप्टरमधून भारतात पळून आल्यानंतर ढाकामधील त्यांच्या राजवाड्याच्या छतावर झेंडे फडकावणाऱ्या जमावाचा फोटो संपूर्ण जगाने पाहिला होता. मात्र एक वर्षानंतर साधारण 17 कोटी लोकांच्या या देशात  अद्यापही राजकीय उलथा-पालथ होत आहे. आता हा विशाल राजवाडा संग्रहालयात बदलणं भविष्यासाठी एक संदेश देण्याचं काम करेल अशी बांगलादेश सरकारची अपेक्षा आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Muhammad Yunus : भारताला आव्हान द्यायला निघालेलं युनूस सरकार कोंडीत! बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तांतर?

शेख हसीनाच्या राजवटीत मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन झाले. त्यांच्या राजकीय विरोधकांना सामूहिकपणे  तुरुंगात टाकण्यात आले, न्यायाचा कोणताही मागमूस न ठेवता त्यांची हत्या करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या मते, सत्तेवर टिकून राहण्याच्या त्यांच्या अयशस्वी प्रयत्नात जुलै ते ऑगस्ट 2024 दरम्यान 1,400 लोक मारले गेले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. 

77 वर्षीय शेख हसीना यांच्याविरोधात ढाकामध्ये मानवतेविरोधातील गुन्ह्याच्या आरोपाखाली प्रकरणं सुरू आहेत. शेख हसीना यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या जिवाला धोका आहे, त्यामुळे सध्या तरी बांगलादेशात जाऊ शकत नाही. 

शेख हसीनाचा राजवाडा संग्रहालयात का रुपांतरित केला जात आहे? 

85 वर्षीय नोबेल शांती पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस विद्यमान अंतरिम सरकारचं नेतृत्व करीत आहे आणि 2026 मध्ये निवडणूका घेतल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, शेख हसीना यांच्या राजवाड्याचं रुपांतर संग्रहालयात केलं जात आहे. यातून शेख हसीना यांच्या कुशासनाच्या आठवणी आणि त्यांना सत्तेवरुन हटविण्यासाठी जनतेचा राग आणि इच्छा याचं जतन होईल. 

एएफपी यांच्या अहवालानुसार, 27 वर्षीय मोस्फिकुर रहमान जोहान एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि डॉक्यूमेंट्री फोटोग्राफर आहे. रहमान त्या हजारो लोकांपैकी एक होते, ज्यांनी तख्तापलट केल्यानंतर शेख हसीनाच्या आलिशान राजवाड्यावर हल्ला केला होता. या राजवाड्यातील हसीना यांचं प्रत्येक निशाण मिटविण्यात आलं आहे. हसीना यांच्या वडिलांची मूर्ती पाडण्यात आली आणि दोघांचे फोटो फाडण्यात आले. आंदोलकांनी दिवंगत शेख मुजीबुर रहमान यांचं घर तोडण्यासाठी बुलडोजरचा वापर केला. हे घर हसीनाने आपल्या वडिलासाठी एक संग्रहालयात बदललं होतं. 

बांगलादेशच्या जनतेने स्वप्न पाहिले होते की शेख हसीना यांना पदावरुन हटवल्यानंतर लोकशाही मजबूत होईल, परंतु आज, एक वर्षानंतर, वास्तव त्यापासून खूप दूर दिसते. बांगलादेशचे अंतरिम नेते युनूस निवडणुकीपूर्वी लोकशाही संस्थांचे बळकटीकरण सुनिश्चित करू इच्छितात. मात्र राजकीय पक्षांकडून खुर्चीसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे लोकशाही बळकटीकरणाचा प्रयत्न मंदावला आहे. आंदोलनाला एक वर्ष होण्यापूर्वीच ह्यूमन राइट्स वॉचने इशारा दिला होता. बांगलादेश नव्या रचनेत आखणे आव्हानात्मक असेल. ह्यूमन राइट्स वॉचने (आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संघटना) सांगितलं की, अंतरिम सरकार असुधारित सुरक्षा क्षेत्र, कधी कधी हिंसक धार्मिक कट्टरपंथी आणि राजकीय समूहांमध्ये अडकून पडल्याचं दिसून येत आहे. यामुळे बांगलादेशातील नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्याऐवजी हसीना यांच्या समर्थकांचा सूड घेण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे.  


 

Topics mentioned in this article