जाहिरात

Trending News: पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर क्रूड बॉम्ब हल्ला,CCTV मध्ये दिसला बुरखाधारी हल्लेखोर, कुठे घडलं?

'द डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, काळीगाछ ताला काली मंदिरावर हा हल्ला झाला.

Trending News: पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर क्रूड बॉम्ब हल्ला,CCTV मध्ये दिसला बुरखाधारी हल्लेखोर, कुठे घडलं?
  • बांगलादेशमधील कुमिला शहरात शनिदेव पूजेच्या वेळी हिंदू मंदिरावर क्रूड बॉम्बने हल्ला झाला
  • जातीय हिंसाचारामुळे हिंदू अल्पसंख्यांकांवर सतत हल्ले होत असून गेल्या आठवड्यात दोन हिंदूंचा खुन करण्यात आला
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी व्यक्ती मंदिरात प्रवेश करून बॅग ठेवताना दिसला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

पुजा सुरू असतानाचा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडली आहे. हा हल्ला क्रूड बॉम्बने करण्यात आला होता. हा हल्ला करणाराही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना बांगलादेशमध्ये घडली आहे. इथं हिंदू अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. 'बांगलादेश जातीय हिंदू महाजोत' या मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बांगलादेशात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. तसेच, कुमिला शहरातील एका मंदिरात झालेल्या देशी बॉम्ब (Crude Bomb) स्फोटात पुजाऱ्यासह चार जण गंभीर जखमी झाल्याने खळबळ माजली आहे.

मानवाधिकार गटाने रविवारी सांगितले की, 6 आणि 7 मार्च 2026 रोजी बोगुरा आणि कॉक्स बाजारमध्ये दोन हिंदूंची हत्या करण्यात आली. तर 8 मार्च रोजी कुमिला शहरात शनिदेवाची पूजा सुरू असताना, एका हिंदू मंदिरावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आले. या स्फोटामुळे भाविकांमध्ये मोठी भीत पसरली. एकच धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली. 7 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास दक्षिण ठाकूरपारा परिसरातील मंदिरात हा प्रकार घडला. ज्यात पुजारी आणि अन्य चार जण जखमी झाले.

नक्की वाचा - Video: बिथरलेला रेडा थेट दुकानात घुसला! दुचाकीला धडक, मुलांचा जीव मुठीत, दहशतीचा थरार CCTV मध्ये कैद

'द डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, काळीगाछ ताला काली मंदिरावर हा हल्ला झाला. कोतवाली मॉडेल पोलिस ठाण्याचे अधिकारी तौहिदुल अनवर यांनी सांगितले की, जखमी पुजारी केशब चक्रवर्ती आणि अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष सजल कुमार चंदा यांनी सांगितले की, धार्मिक विधी सुरू असतानाच हा स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी व्यक्ती मंदिरात प्रवेश करताना आणि एक बॅग तिथेच सोडून जाताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच स्फोट झाला. हल्लेखोरांनी जवळच असलेल्या एका बौद्ध मंदिरावर आणि खाजगी कार्यालयावरही बॉम्ब फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नक्की वाचा - Rapido bike ban: रॅपिडोला सरकारचा दणका! थेट परवानाच रद्द, काय घडलं, कारण काय?

मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस मृत्युंजय कुमार रॉय यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 मार्च 2026 रोजी बोगुरा जिल्ह्यातील सरियाकंडी येथे जमीन वादातून 40 वर्षीय चायोन राजभर यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. चायोन हे एका कोचिंग सेंटरचे संचालक होते. त्यानंतर 7 मार्च रोजी कॉक्स बाजारमध्ये 29 वर्षीय गणेश पाल या हिंदू तरुणाची खंडणी देण्यास नकार दिल्याने हत्या करण्यात आली. चट्टोग्राम शहरातही अशाच हिंसक घटना समोर आल्या आहेत. अलंकार परिसरात आकाश दास नावाच्या तरुणाची 'मजुरांकडून होणाऱ्या वसुलीला' विरोध केल्यामुळे हत्या झाली. तर चंदनैश उपजिल्ह्यात 70 वर्षीय चंदन डे यांची गुरांची चोरी रोखल्यामुळे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

नक्की वाचा - Rohit Sharma Video: भर मैदानात रोहित शर्मा बायकोवर खेकसला, दोघांची हमरी-तुमरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com