'मी पुन्हा येईन' शेख हसीना यांचे शेवटचे भाषण का झालं नाही सार्वजनिक?

अमेरिकेला बंगालच्या खाडीमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी जर मी मान्यता दिली असती तर सत्तेत राहू शकले असते.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्या आधी देशाला संबोधित करायचे होते. ढाका इथल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानातून त्यांनी ही तयारीही केली होती. देशात ज्या पद्धतीने आंदोलन उभे राहीले होते. ज्या आंदोलनामुळेच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आंदोलन करणारे अगदी त्यांच्या सरकारी निवास्थाना जवळ पोहोचले होते. मात्र देशाला संबोधित न करता तुम्ही देश सोडून जा असा सल्ला त्यांना त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली होता. तो सल्ला त्यांना मान्य करावा लागला त्यानंतर त्यांनी देश सोडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

द इकोनॉमिक टाइम्सने एक बातमी दिली आहे. शेख हसीना जे शेवटचं भाषण करणार होत्या त्याबद्दल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर भारतात चर्चा केली आहे. त्यात त्या सांगतात बांगलादेशातील सत्ता परिवर्तना मागे एक षडयंत्र रचले गेले आहे. या षडयंत्रा मागे अमेरिका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशात असताना भाषण करण्याची संधी मिळाली असती तर त्यांनीहा मुद्दा मांडण्याचे ठरवले होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  सुप्रिया सुळेंचा फोन - वॉट्सअप हॅक, केलं मोठं आवाहन

त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यां बरोबर या गोष्टी बोलल्या आहेत. शेख हसीना म्हणतात मी राजीनामा दिला आहे. कारण मला अनेकांचे जीव जाताना पाहायचे नव्हते. ज्या लोकांनी हे षडयंत्र रचले त्यांना विद्यार्थ्यांच्या हत्येतून सरकारमध्ये यायचे होते.  पण विद्यार्थ्यांच्या हत्या मला मान्य नव्हत्या. त्यामुळे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपण सत्तेत राहू शकलो असतो. जर मी  सेंट मार्टिन बेट अमेरिकेच्या हवाली केले असते. अमेरिकेला बंगालच्या खाडीमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी जर मी मान्यता दिली असती तर सत्तेत राहू शकले असते. पण मी तसे केले नाही. मी माझ्या देशवासीयांना विनंती करते की कट्टरवाद्यांच्या जाळ्यात अडकू नका. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, खिशातून पिस्तुल काढली, नेम धरला अन्...

बांगलादेशमध्ये अवामी लिगच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्याबद्दल शेख हसीना यांनी दुख: व्यक्त केले आहे. पुढे त्यांनी सांगितलं की त्या लवकरच बांगलादेशला परतणार आहेत. आवामी लिगवर अनेक वेळा आघात झाला आहे. त्या त्या वेळी नव्याने आवामी लिगने सुरूवात केली आहे. बांगलादेशसाठी आपण नेहमीच प्रार्थना करत राहू असंही त्या म्हणाल्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले

बांगलादेशमध्ये ज्यावेळी आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्यावेळी त्यांनी सांगितले होती की स्वातंत्रसैनिकांच्या नातू नातींना आरक्षण द्यायचं नाही तर मग काय रजाकारांच्या नातू नातींना आरक्षण द्यायचं का? असं वक्तव्य केलं होते. रजाकार म्हणजे बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात पाकिस्तानला मदत करणारे जे होते त्यांचा उल्लेख रजाकार असा केला जातो. शेख हसीना पुढे म्हणतात मी बांगलादेशच्या नागरिकांना रजाकार म्हटले नाही. लोकांना चिड निर्माण होण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्या म्हणाल्या.  

ट्रेंडिंग बातमी - हिंडनबर्गचा रिपोर्ट तथ्यहीन, SEBI च्या प्रमुखांनी आरोप फेटाळले

शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि अमेरिकेतले संबध ताणले गेले होते. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांचा विजय झाला. पण या निवडणुका निष्पक्ष पणे झाल्यानसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. शेख हसीना यांनी काही महिन्या पूर्वी आपले सरकार पाडण्यासाठी बाहेरच्या शक्ती काम करत असल्याचे म्हटले होते. शिवाय बांगलादेश आणि म्यानमारच्या बाजूला आणखी एक देश बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या असा आरोप केला होता. शिवाय एक खास देशाला आपण एअरबेस बनवण्याचा परवानगी दिली असती तर आपले सरकार टिकले असते असेही त्या म्हणाल्या.