जाहिरात
This Article is From Aug 11, 2024

ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, खिशातून पिस्तुल काढली, नेम धरला अन्...

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी मात्र पसार झाला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, खिशातून पिस्तुल काढली, नेम धरला अन्...
सांगली:

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये (Sangli Kavthe Mahankal News) शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र गोळीबार करताना पिस्तुल लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी मात्र पसार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. 

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मात्र हल्लेखोराकडे असलेली पिस्तुल लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  हल्लेखोर या प्रकारानंतर पसार झाला आहे. कवठेमहांकाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुल लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे.