ब्रिटनमध्ये 'अब की बार 400 पार'; ऋषी सुनक यांचा पराभव, लेबर पार्टीचा ऐतिहासिक विजय

ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. मला दु:ख आहे, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असं सुनक यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Britain Election: कौन हैं ब्रिटेन में जीत की ओर बढ़ रहे कीर स्टार्मर.

Britain Elections: ब्रिटनमध्ये सत्तांतर होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. लेबर पार्टीचे कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल दोन्हीमध्ये लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर हाती येत असेलल्या कलांनुसार देखील लेबर पार्टी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. लेबर पार्टीच्या विजयानंतर कन्जर्वेटिव्ह पार्टीच्या 14 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागणार आहे. 

ऋषी सुनक यांच्या पक्षाचा या निवणुकीत दारुण पराभव होत आहे. लेबर पार्टीने आतापर्यंतच्या निकालात 382 जागांवर विजय मिळवला आहे, जो बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. लेबर पार्टीचे  कीर स्टार्मर हे नवे पंतप्रधान बनणार आहेत. विजयानंतर बोलताना कीर स्टार्मर यांनी म्हटलं की, 14 वर्षांनंतर आपलं भविष्य पुन्हा मिळालं आहे.

ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. मला दु:ख आहे, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असं सुनक यांनी म्हटलं. सुनक यांनी कीर स्टार्मर यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

कोण आहेत कीर स्टार्मर?

स्टार्मर पहिल्यांदा 2015 मध्ये संसदेत निवडून आले होते. यानंतर ते एक वर्ष ब्रिटनच्या शॅडो कॅबिनेटमध्ये इमिग्रेशन मंत्री होते. याशिवाय, स्टार्मर हे 2016 ते 2020 पर्यंत युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडण्यासाठी राज्याचे सचिव देखील होते. एप्रिल 2020 मध्ये, स्टार्मर लेबर पार्टीचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. परंतु लगेचच त्यांच्या पक्षाचा 85 वर्षांतील सर्वात मोठा पराभव झाला.

Advertisement