तब्बल 12 तास मृतदेह हवेतच! ब्रिटिश एअरवेजच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू; दुर्गंधीमुळे प्रवाशांचे हाल

हॉन्गकॉन्गहून लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह विमानाच्या 'हीटेड फ्लोअर' (गरम मजला) असलेल्या गॅलीमध्ये ठेवल्याने विमानात दुर्गंधी पसरली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins

ब्रिटिश एअरवेजच्या हॉन्गकॉन्ग ते लंडन या 13.5 तासांच्या विमान प्रवासात एका 60 वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या एका तासात हा मृत्यू झाला, मात्र विमानाचे लँडिंग होईपर्यंत मृतदेह ज्या पद्धतीने ठेवण्यात आला, त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

ब्रिटिश एअरवेजचे विमान (BA32) हॉन्गकॉन्गहून लंडनच्या दिशेने झेपावल्यानंतर काही वेळातच एका 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअरबस A350-1000 या विमानाने उड्डाण करून जेमतेम एक तास झाला असताना ही घटना घडली. मात्र, प्रवाशाचा मृत्यू हा 'वैद्यकीय आणीबाणी' (Medical Emergency) मानला जात नसल्याने वैमानिकांनी विमान परत न फिरवता लंडनपर्यंत प्रवास सुरूच ठेवला.

Advertisement

विमानात प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना क्रू मेंबर्सकडून मोठी चूक झाल्याचा आरोप होत आहे. मृतदेह सुरुवातीला स्वच्छतागृहात ठेवण्याचा विचार झाला, पण तो नाकारून विमानाच्या मागील बाजूच्या गॅलीमध्ये हलवण्यात आला. मात्र, तेथील मजला गरम होता, याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले.

(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरातबाबतचे आतापर्यंतचे 10 मोठे खुलासे, पोलिसांसह सारेच चक्रावले)

प्रवाशांचा संताप

प्रवासाचे 12 तास शिल्लक असताना उष्णतेमुळे मृतदेहातून दुर्गंधी सुटली आणि ती संपूर्ण केबिनमध्ये पसरली. 331 प्रवाशांना या दुर्गंधीतच प्रवास करावा लागला. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी विमानाचा ताबा घेतला आणि तपास संपेपर्यंत प्रवाशांना 45 मिनिटे विमानातच बसवून ठेवले.
 
नियमावली काय सांगते? 

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मृतदेह बॉडी बॅगमध्ये किंवा चादरीने झाकून ठेवावा. शक्य असल्यास मृतदेह कमी गर्दीच्या ठिकाणी किंवा रिकाम्या सीटवर हलवावा. जर विमान पूर्ण भरलेले असेल, तर मृतदेह त्याच्या मूळ सीटवरच ठेवावा लागतो.

(नक्की वाचा-  Ashok Kharat Case: अशोक खरातचा लोकांना फसवण्याचा 'रिमोट कंट्रोल' पॅटर्न, पैसे कसे उकळायचा?)

एअरलाईन्सची भूमिका

या घटनेवर ब्रिटिश एअरवेजने स्पष्टीकरण दिले आहे की, "आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे. या कठीण प्रसंगी आमची सहानुभूती मृत प्रवाशाच्या कुटुंबासोबत आहे." मात्र, मृतदेह गरम मजल्यावर ठेवण्याच्या निर्णयामुळे एअरलाईन्सवर जगभरातून टीका होत आहे.

Advertisement

2013 मधील 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'च्या अभ्यासानुसार, विमानात वैद्यकीय आणीबाणीमुळे होणारे मृत्यू अत्यंत दुर्मिळ आहेत. एकूण आणीबाणीच्या घटनांपैकी केवळ 0.3 टक्के प्रकरणांमध्ये प्रवाशाचा मृत्यू होतो.

Topics mentioned in this article