Earthquake Alert : भूकंप येण्यापूर्वीच मोबाईलवर येणार मेसेज! गूगलच्या नव्या सिस्टीममुळे लाखो प्राण वाचणार?

Google Earthquake Alert: व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंप येण्यापूर्वीच लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सच्या स्क्रीनवर एक इशारा फ्लॅश झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Google Earthquake Alert: भूकंप येण्याच्या काही सेकंद आधी  तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला, तर?
मुंबई:

Google Earthquake Alert: भूकंप येण्याच्या काही सेकंद आधी  तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला, तर? व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकन देशात नुकतेच असे काहीतरी घडले, ज्याने जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला आणि सामान्य लोकांना थक्क केले आहे. तिथे शक्तिशाली भूकंप येण्यापूर्वीच लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सच्या स्क्रीनवर एक इशारा फ्लॅश झाला. जमिनीला पहिला तीव्र  हादरा बसण्यापूर्वी मिळालेल्या या अवघ्या काही सेकंदांच्या अलर्टमुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात का, यावर आता जागतिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

निसर्गाच्या या प्रकोपाचा अंदाज घेणे माणसाला अजूनही शक्य झालेले नाही, पण गूगलच्या एका खास सिस्टीमने या संकटाची पूर्वकल्पना देऊन लोकांना सावध केले. हे नेमके कसे घडले आणि तुमचा मोबाईल तुमचा जीव कसा वाचवू शकतो, हे समजून घेणे प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement

गूगलने भूकंपाचे भाकीत केले नाही, तर...

अनेकांचा असा समज झाला आहे की गूगलने भूकंपाचा अंदाज आधीच वर्तवला होता, पण तसे नाही. गूगलने भूकंपाची भविष्यवाणी केली नव्हती, तर भूकंपाचे सुरुवातीचे अत्यंत सूक्ष्म धक्के ओळखून, मुख्य विनाशकारी झटका बसण्यापूर्वीच प्रभावित भागातील लोकांना तातडीने अलर्ट पाठवला होता. गूगलची ही अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम जगभरातील अब्जावधी अँड्रॉइड स्मार्टफोनच्या नेटवर्कवर काम करते.

आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये मोशन सेन्सर्स (अ‍ॅक्सलेरोमीटर) असतात, जे जमिनीची अगदी लहान हालचालही टिपू शकतात. जेव्हा भूकंप होतो, तेव्हा सर्वात आधी प्राथमिक लहरी (P-waves) निघतात. या लहरी मुख्य विनाशकारी लहरींपेक्षा (S-waves) जास्त वेगाने प्रवास करतात. जेव्हा एकाच भागातील अनेक स्मार्टफोन या लहरी टिपतात, तेव्हा गूगलचे अल्गोरिदम भूकंपाचे केंद्र आणि त्याची तीव्रता यांचा अंदाज लावते आणि सेकंदाच्या आत तिथल्या सर्व युजर्सना अलर्ट पाठवते.

( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे? )

अवघ्या काही सेकंदांचा खेळ, पण लाखो प्राण वाचणार

भूकंप आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मिळणारे काही सेकंद हे जीवन आणि मृत्यूमधील अंतर ठरवू शकतात. या सिस्टीममुळे मिळणाऱ्या काही सेकंदांच्या पूर्वसूचनेमुळे लोकांना धोकादायक इमारतींमधून बाहेर पडण्यास, चालू असलेली अवजड किंवा धोकादायक कामे थांबवण्यास आणि सुरक्षित जागा शोधण्यास मोलाचा वेळ मिळतो. शहरांचा होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता ही सिस्टीम भविष्यात संजीवनी ठरू शकते.

केवळ भूकंपच नाही, इतर नैसर्गिक संकटांवरही तंत्रज्ञानाचा वॉच

तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या सिस्टीमचा वापर केवळ भूकंपा पुरताच मर्यादित न राहता पूर, चक्रीवादळ आणि तीव्र उष्णतेची लाट (हीट वेव्ह) यांसारख्या इतर नैसर्गिक आपत्तींमध्येही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्या थेट नागरिकांपर्यंत आपत्कालीन माहिती सेकंदाच्या आत पोहोचवू शकतात.

Advertisement

आता पारंपरिक मॉनिटरिंग स्टेशनवर अवलंबून न राहता क्लाउड कम्प्युटिंग आणि रिअल-टाइम डेटा नेटवर्कच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत केले जात आहे. कोणतीही सिस्टीम निसर्गाचे संकट रोखू शकत नाही, पण जेव्हा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, तेव्हा हे आधुनिक तंत्रज्ञान माणसाला सुरक्षित राहण्यासाठी मौल्यवान वेळ नक्कीच मिळवून देऊ शकते.
 

Topics mentioned in this article