बॉयफ्रेंडला करायची शेकडो कॉल-मेसेज, उत्तर न मिळाल्यास वागायची विचित्र! डॉक्टर म्हणाले-Love Brainची समस्या

Love Brain Symptoms: तरुणीने तिच्या प्रियकराला एकाच दिवसात 100 हून अधिक कॉल केले. पण त्याने एका फोनचे उत्तर दिले नाही, तेव्हा परिस्थिती अधिक बिघडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
बॉयफ्रेंडला दररोज करायची शेकडो फोन-मेसेज

Love Brain: चीनमधील एक 18 वर्षीय तरुणी प्रेमामध्ये इतकी आकंठ बुडाली होती की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली. तरुणीचे नाव जियाओयू (Xiaoyu) असल्याचे म्हटले जात आहे. 'द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे (Borderline Personality Disorder) त्रस्त असू शकते. रिपोर्ट्सनुसार, कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत असताना जियाओयूच्या वागणुकीतील बदल होण्यास सुरुवात झाली. ती पूर्णपणे प्रियकरावर अवलंबून राहू लागली. इतकंच नव्हे तर जियाओयू बॉयफ्रेंडला सतत कॉल करून 'तू कुठे आहे?' आणि 'काय करत आहेस?' असे प्रश्न विचारायची. तिच्या या वागण्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ लागला. ज्यामुळे प्रियकराला दबाव जाणवू लागला, त्याला बंदिस्त असल्यासारखे वाटू लागले.  

(नक्की वाचा: कमी झोपेमुळे 'Silent Epidemic' चा धोका, काय आहे हा आजार?)

घरातील सामानांचे करू लागली नुकसान

जियाओयूने आपल्या प्रियकराला एकाच दिवसात 100 हून अधिक वेळा फोन केले, पण त्याने एकाही फोनचे उत्तर दिले नाही. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली आणि घरातील सामानाचे नुकसान करू लागली. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रियकराने पोलिसांना संपर्क केला. जियाओयू बालकनीतून खाली उडी मारण्याची धमकी देत असतानाच अधिकारी तेथे पोहोचले आणि तिला सामान्य स्थितीत आणण्यासाठी मदत केली.  

Advertisement

'द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, जियाओयूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, यानंतर तिला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरने ग्रासल्याचे समजले.  

(नक्की वाचा: 'मी तेव्हा 8 आठवड्यांची प्रेग्नेंट होते...' चुकीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या महिलेने फेटाळला बॉसचा माफीनामा)

बोलीभाषेमध्ये या आजारास म्हणतात 'लव्ह ब्रेन' (Love Brain)

दरम्यान वैद्यकीय भाषेनुसार हा प्रमाण शब्द नाही. पण प्रेमसंबंधामध्ये अशा प्रकारे विचित्र वागणुकीचे वर्णन करण्यासाठी 'लव्ह ब्रेन' (Love Brain) या शब्दाचा वापर केला जातो. ज्या हॉस्पिटलमध्ये जियाओयूवर उपचार सुरू होते, तेथील डॉक्टर डॉ. डू ना यांनी सांगितले की, कधीकधी चिंता-नैराश्य यासारख्या आजारांमुळे बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकतो. बालपणाच्या एखाद्या वाईट नात्यामुळे हा आजार होऊ शकतो. शिवाय तरुणाने तिच्या मेसेजला तातडीने उत्तर द्यावे, अशीही तिची अपेक्षा होती.  

Advertisement

(नक्की वाचा: बापरे! या ज्वालामुखीतून बाहेर येतंय लाखोंचं सोनं, कुठे आहे ठिकाण?)

आजारामागील कारणांचा खुलासा नाही 

डॉ. डू यांनी जियाओयूच्या आजारामागील कारणांचा खुलासा केला नाही. पण त्यांनी असे म्हटले की, ही लक्षणे सहसा अशा लोकांमध्ये आढळतात, ज्यांचे बालपणी पालकांशी चांगले संबंध नसतात. दरम्यान काही प्रकरणांमध्ये विशिष्ट भावनिक व्यवस्थापनाच्या मदतीने सुधारणा होऊ शकते. जियाओयूसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये वैद्यकीय हस्तपेक्ष आवश्यक असतो, असेही डॉक्टर डू यांनी अधोरेखित केले. 

Advertisement

VIDEO: बड्या कंपन्यांच्या हेल्थ ड्रींक मुलांसाठी घातक?

Topics mentioned in this article