अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून न्यूयॉर्कची ओळख आहे. गुरुवारी रात्री अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये
ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. कधी नव्हे तर त्या पावसानं न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरच्या सगळ्या गाड्या तीन चार फूट पाण्यातून वाट काढताना दिसत होत्या. न्यूयॉर्कमधील सबवे म्हणजे भूमिगत मेट्रो ही प्रवाशांसाठी लाईफलाईन मानले जाते. पण गुरुवारी रात्री सेंट्रल न्यूयॉर्कचं मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेलं होतं. अशीच परिस्थिती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रत्येक शहरात बघयाला मिळाली.
पेन्सिलव्हेनियामधील राष्ट्रीय हवामान विभागाच्या कार्यालयानं दिलेल्या माहिती नुसारगुरुवारी दुपारच्या सुमारास पूर्व किनारपट्टीवर वादळाची स्थिती तयार झाली. ही स्थिती संध्याकाळी उशिरापर्यंत कायम होती. पेन्सिलव्हेनिया, न्यूजर्सी, मेरिलँड आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये तूफान पाऊस झाला. पेन्सिलव्हेनिया आणि मेरिलँडमधील अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्याचं नॅशनल वेदर सर्व्हिस न म्हटलं आहे.
नक्की वाचा - Emotional Story: 7 वर्षांत 42 वेळा प्रपोज, प्रत्येक वेळी नकार, 43 व्या प्रयत्नात असं काही घडलं की...
अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अशी वादळं नेहमीच येत असतात. एप्रिल ते ऑगस्ट हा काळ वादळांचा काळ म्हणूनच ओळखला जातो. 2024 मध्ये या भागात 23 वादळं आली होती. 11 चक्रीवादळं आणि 5 मोठी चक्रीवादळं याच भागात आली. यंदा ही वादळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असं डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलं. ते अमेरिकेतील पीट्सबर्ग या शहरात वास्तव्याला आहेत.
नक्की वाचा - US India Trade Deal : अमेरिकेचा टॅरिफ स्टाईक; भारतातील 'या' 5 टॉप प्रॉडक्टला सर्वाधिक फटका
न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये मोठ्याप्रमाणात मध्यमवर्गीय अमेरिकनं लोक राहातात. शहरांमध्ये वारंवार होणाऱ्या ढगफुटी सदृश्य पावसानं यंत्रणावर ताण येऊ लागला आहे. याचं प्रमुख कारण हे की निर्माण होणाऱ्या वातावरणीय परिस्थिती इतक्या वेगानं निर्माणात होतायत की यंत्रणांना प्रतिसाद देण्याची संधीच मिळत नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होणारी ही परिस्थिती वरचेवर वाढत जाणार आहे. त्यामुळे यंत्रणांची प्रतिसाद देण्याच्या क्षमतांची अग्निपरीक्षा असणार आहे.