जाहिरात

Emotional Story: 7 वर्षांत 42 वेळा प्रपोज, प्रत्येक वेळी नकार, 43 व्या प्रयत्नात असं काही घडलं की...

Emotional Couple Story: कधी प्रागच्या किल्ल्यात कँडल लाइट डिनरवर, तर कधी जमैकाच्या बेटावर घोडेस्वारी करताना त्याने तिला प्रपोज केलं.

Emotional Story:  7 वर्षांत 42 वेळा प्रपोज, प्रत्येक वेळी नकार, 43 व्या प्रयत्नात असं काही घडलं की...

Proposed 43 times in 7 years : इंटरनेटवर सध्या एक अनोखी प्रेम कहाणी व्हायरल होत आहे. जी केवळ खऱ्या प्रेमाचं उदाहरण नाही, तर धैर्य आणि समर्पणाचं प्रतीक बनली आहे. ही गोष्ट यूकेमधील ल्यूक विंट्रिप आणि त्यांची गर्लफ्रेंड साराची आहे. यात ल्यूकने 7 वर्षांत 43 वेळा लग्नासाठी साराला विचारलं. प्रत्येक वेळी सारानं त्याला नकार दिला. पण तो खचला नाही. प्रयत्न करायचेच असं त्याने मनाशी ठरवलं होतं. त्याने हार मानली नव्हती. म्हणूनच मग 43 व्या वेळी त्याने पुन्हा साराला प्रपोज केलं. तिने त्याला जे उत्तर दिलं, त्यानंतर नेटकरी मात्र सुसाट सुटले आहेत. त्यामुळेच या लव्ह स्टोरीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. 

व्हायरल लव्ह स्टोरी (Viral Love Story 2025)

ल्यूक हा व्यवसायाने टॅटू आर्टिस्ट आहे. तर सारा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. त्यांच्या नात्याला फक्त सहा महिने झाले असताना, ल्यूकने पहिल्यांदा साराला लग्नाची मागणी घातली. पण साराने नकार दिला. खरं तर, सारा नुकत्याच तिच्या जुन्या नात्यातून बाहेर पडली होती. सारा ही  तीन मुलांची आई आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना साराला तो विचापूर्वक घ्यायचा होता. त्यामुळे तिने ल्यूकला आधी नकार दिला होता.  पण ल्यूकने हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक वेळी नवीन पद्धतीने साराला प्रपोज केलं. कधी प्रागच्या किल्ल्यात कँडल लाइट डिनरवर, तर कधी जमैकाच्या बेटावर घोडेस्वारी करताना त्याने तिला प्रपोज केलं. तब्बल 42 वेळा नकार मिळाल्यानंतरही त्यांनी आपलं प्रेम व्यक्त करणं थांबवलं नाही.

नक्की वाचा - फेमस अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, लग्नाच्या काही तासातच केली बायकोच्या प्रेग्नंसीची घोषणा

43 वेळा प्रपोजल (Marriage Proposal Viral)

सारा म्हणते, ल्यूकला पाहून असं वाटायचं की प्रत्येक वेळी त्याचं प्रपोजल आधीपेक्षा जास्त खास होतं. त्याने मला कधीही जबरदस्ती केली नाही, फक्त प्रेम व्यक्त केलं. 42 व्या नकारानंतर सारा म्हणाली होती, पुढच्या वेळी जर योग्य वेळ असेल तर मी 'हो' म्हणेन आणि ती वेळ 2023 मध्ये आली. जेव्हा ल्यूक साराला लंडनच्या ग्रीनविचला घेऊन गेला. जगाचं टाइम सेंटर. तिथे एका गुडघ्यावर बसून ल्यूकने विचारलं, "हे जगाचं केंद्र आहे आणि तू माझ्या जगाची, माझ्याशी लग्न करशील का?" आणि यावेळी साराने हसून 'हो' म्हटलं.

नक्की वाचा - प्राजक्ता माळीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्याने जीव घातला धोक्यात, पाहा अभिनेत्रीने कशी हाताळली परिस्थिती

भावनिक प्रेम कहाणी (Emotional Couple Story)

मे 2023 मध्ये दोघांनी जमैकामध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. सारा म्हणाली, ल्यूकचं प्रेम आणि धैर्य हेच कारण आहे की मी आज त्याची पत्नी आहे. त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळायला हवं. 7 वर्षं, 42 नकार आणि शेवटी एक 'हो'. ल्यूक आणि साराची ही प्रेम कहाणी हेच सांगते की खरं प्रेम मिळायला वेळ लागतो, पण जर मनापासून काही हवं असेल तर ते नक्कीच मिळतं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com