संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे कर्नल वैभव अनिल काळे यांना सोमवारी वीरमरण आलं. माजी लष्करी अधिकारी असलेले कर्नल वैभव काळे (46) हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून त्यांनी 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यात वास्तव्यास होते. दोनच महिन्यापूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रूजू झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कर्नल आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला, यात त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासह सोबत असलेले सहकारी गंभीर जखमी झाले. काळे यांच्या निधनानंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून या हल्ल्यातील चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय तातडीने शस्त्रबंदी लागू करण्याबरोबरच ओलिसांची मुक्तता करण्यात यावी अशी मागणी गुटेरेस यांनी केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.