भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक (Zakir Naik) याने सध्या पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. वाट्टेल ते बरळणाऱ्या झाकीर नाईकची जीभ पाकिस्तानात गेल्यानंतर अधिकच सैल झाली आहे. झाकीरची विधाने ही त्याच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारी असून एका मुलाखतीमध्ये त्याने महिलांविषयी भयंकर विधान केले आहे. झाकीरची एका महिला वृत्तनिवेदकाने मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये झाकीरने महिला अँकरबद्दलच भयंकर विधान केले.
नक्की वाचा : 'मी तिला मारले नसते तर..' गर्लफ्रेंडचे 59 तुकडे करुन फ्रिज ठेवणाऱ्या मृत आरोपीच्या नोटमधून ट्विस्ट
झाकीर नाईक याने म्हटले कीस एखाद्या पुरुषाने फुल मेकअप केलेल्या वृत्त निवेदिकेकडे 20 मिनिटे पाहिले आणि त्याला काही वाटेनासे झाले असेल तर त्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. त्याने पुढे म्हटले की एखाद्या तरुणीला 20 मिनिटे तुम्ही पाहिले आणि तुमच्या हृदयाची धडधड वाढली नाही तर तो माणूस वैद्यकीयदृष्ट्या आजारी आहे. झाकीरच्या या विधानावरून सोशल मीडियावर जबरदस्त नाराजीचा सूर उमटू लागला आहे. झाकीरचे विधान हे अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलाविरोधी असल्याची टीका केली जाऊ लागली आहे. महिलांप्रती आणि खासकरून महिला वृत्त निवेदिकांविषयीची झाकीरची विकृत मानसिकता त्याच्या या विधानातून दिसून येत असल्याचे टीकाकार म्हणत आहेत.
यापूर्वी झाकीर नाईक याने म्हटले होते की अविवाहीत महिलांचा मान ठेवला जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे दोनच पर्याय असतात, पहिला म्हणजे विवाहीत पुरुषाशी लग्न करणे किंवा शरीर विक्रय करणे. कोणतीही स्वाभिमानी महिला पहिलाच पर्याय निवडतील. झाकीर नाईकच्या या विधानाचाही कडाडून विरोध करण्यात आला होता. पाकिस्तानातील प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाकारांनी त्याच्या विधानाचा विरोध केला होता. प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने म्हटले होते की महिलांच्या स्वाभिमान, सन्मानाचे आकलन तिच्या वैवाहीक स्थितीवरून केले जाऊ शकत नाही. इस्लाममध्ये महिलांचा सन्मान करणे शिकवले जाते. महिलांप्रती सहीष्णू भूमिका घेणे गरजेचे असते. समीना पीरजादा नावाच्या अभिनेत्रीनेही झाकीरवर टीका केली होती. तिने म्हटले की, अशा पद्धतीची विधाने हे समाजात तेढ निर्माण करतात आणि असामनताही निर्माण करतात. महिलांप्रती समाजाने उदार दृष्टीकोण ठेवला पाहीजे.