दोन मुलांना आपल्या जवळ मुंग्या बाळगणे चांगलेच अंगलट आले आहे. त्यांना त्याची भयंकर शिक्षा ही मिळाली आहे. ही घटना केन्यामध्ये घडली आहे. केन्यातील बेल्जियम या शहरात ही दोन मुलं राहात होती. या मुलांकडून 5,000 मुंग्या जप्त करण्यात आल्या. तिथल्या वन विभागाने ही कारवाई केली. अशा पद्धतीने मुंग्या बाळगणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यांचे उल्लंघन आहे. त्या नुसार त्या दोघांनाही 7,700 डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. तो भरला नाही तर त्यांना 12 महिने तुरुंगात रहावं लागेल. त्या देशात वन्यजीव कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल 12 महिन्यांची कैद ही कमाल शिक्षा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलांकडून मुंग्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या युरोपियन आणि आशियाई बाजारात तस्करी केल्या जाणार होत्या. या मुंग्या दुर्मीळ आहेत. त्यामुळे त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. बेल्जियमचे रहिवासी लोर्नाय डेव्हिड आणि सेप्पे लोडेविज्क्स यांना 5 एप्रिल रोजी एका गेस्ट हाऊस मधून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून 5,000 मुंग्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही मुलांचे वय 19 वर्षे आहे.
ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांवर 15 एप्रिल रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते. केन्या वन्यजीव सेवेने यापूर्वी सांगितले होते की, दोन्ही मुले युरोप आणि आशियाई बाजारात मुंग्यांच्या तस्करीमध्ये सामील होते. एजन्सीनुसार, दोघांना एवढा मोठा दंड यासाठीही ठोठावण्यात आला आहे, कारण जप्त केलेल्या मुंग्यांमध्ये 'मेसोर सेफेलोट्स' नावाच्या मुंगीच्या प्रजातीचाही समावेश आहे. जी पूर्व आफ्रिकेत आढळणारी एक विशिष्ट, मोठी आणि लाल रंगाची मुंगी आहे. त्याला विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळेच त्याची तस्करी केली जाते.