मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का

मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिम देशांमधील फरक त्यांच्या जनतेला सांगितला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामायण आणि भारत याचं एक अतुट नातं आहे. भारतात देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रामायणाचे प्रयोग सादर होतात. रामलिला अनेक ठिकाणी पाहिल्या जातात किंवा त्याचे आयोजन ही केले जाते. पण एका मुस्लिम देशात रामायणाचा प्रयोग होत असेल तर? शिवाय हा प्रयोग करणारे कलाकारा, पाहाणारे प्रेक्षकही मुस्लिम असतील तर? हे तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. पण हे घडलं आहे. ते ही दुसऱ्या तिसऱ्या मुस्लिम देशात नाही तर चक्क पाकिस्तानात रामायणाचा प्रयोग झाला आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात सध्या रामायणाचे प्रयोग होत आहेत. 
  
पाकिस्तानमध्ये सध्या रामायणाचे प्रयोग सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता हे नाट्य प्रयोगातून दिसत आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण केलं जात आहे. मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता असं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये सध्या जय श्री रामाच्या घोषणा दिल्या जात आहेत.  ज्या पाकिस्तानमध्ये हिंदू धर्माला कडाडून विरोध केला जातो. त्याच पाकिस्तानात सध्या जय श्रीराम आणि रामायणाचे प्रयोग पाहिले जात आहेत. 

नक्की वाचा - Nalasopara News: भर रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांना बाप-लेकाने चोपले, फ्री स्टाईल हाणामारीचा video viral

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी काही महिन्यांपूर्वी  टू नेशन थिअरी'वर केलेल्या वक्तव्यानं दोन देशात तेढ निर्माण झाली होती. मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिम देशांमधील फरक त्यांच्या जनतेला सांगितला होता. ते म्हणाले होते आपल्या पूर्वजांनुसार आपण हिंदूंपासून वेगळे आहोत.आपला धर्म, परंपरा, संस्कृती, विचार वेगळे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव होता. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरलं होतं त्याच पाकिस्तानच्या कराचीत रामलीला सादर केली जात आहे. पाकिस्तानमधल्या रामायणाचे फोटो, व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर कराचीत कला, आस्था आणि संस्कृतीच्या सीमा पार करत एक नवा आदर्श निर्माण होताना दिसत आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mysterious Place: जंगलात रहस्यमय गाव, चित्रविचित्र आवाजामुळे नेहमीच येतं चर्चेत, तुम्हाला माहित आहे का?

कराचीच्या सिंध प्रांतातील प्रसिद्ध कराची आर्ट काऊन्सिलच्या मंचावर रामायण नाट्य सादर करण्यात आलं. रामायण पाहून स्थानिकांनी कौतुक केलं. पाकिस्तानात इस्लामनंतर हिंदू धर्म  हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. पाकिस्तानमध्ये 2017 साली हिंदूंची लोकसंख्या 35 लाख होती. हीच लोकसंख्या 2023 मध्ये 38 लाखांवर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या 1.61 टक्के आहे. कराचीच्या मौज नावाच्या थिएटर ग्रुपनं रामायण सादर करण्याचा प्रयत्न केला. रामायण भारतातील पौराणिक आणि सर्वात प्राचीन कथांमधील एक आहे. रामायणात धर्म आणि अधर्म, त्याग आणि संकल्पनाची गाथा आहे. आता पाकिस्तानच्या थिएटरमध्ये रामायणाची पाहायला मिळत आहे. रामायण सादर करताना संस्कृती, धार्मिक भावना, वेशभूषा उत्तमरित्या साकारण्यात आलीहे ही विशेष म्हणावे लागेल. 

Advertisement