कोरोनानंतर आता या महामारीचा जगाला धोका ! 4 कोटी जणांचा मृत्यू होण्याची भीती

Superbug : कोरोनाच्या तडाख्यानंतर जग आता सावरत आहे. त्यातच आणखी एका महामारीची भीती वैद्यानिकांनी व्यक्त केली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा (Corona Virus) संहार साऱ्या जगानं अनुभवला आहे. या आजारानं सर्व जग ठप्प केलं. कित्येकांचा जीव गेला. तसंच जगातील प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम झाला. कोरोनाच्या तडाख्यानंतर जग आता सावरत आहे. त्यातच आणखी एका आजाराची भीती वैद्यानिकांनी व्यक्त केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'सुपरबग' असे या नव्या महामारीचे नाव आहे. ज्या बॅक्टेरियांवर अँटी-बायोटिक औषधांचाही परिणाम होत नाही. त्यांना सुपरबग असं म्हणतात. याबाबतच्या ताज्या संशोधनानुसार पुढच्या 25 वर्षांमध्ये (2050 पर्यंत) या आजारामुळे जगभरात 4 कोटी जणांचा मृत्यू होऊ शकतो. या आजारावर आत्तापासूनच संशोधन केलं नाही, तर याचे आणखी गंभीर परिणाम होतील, अशी भीती या संशोधनात व्यक्त करण्यात आलीय.  'द लॅसेंट' जर्नलच्या रिपोर्टनुसार सुपरबगमुळे 1990 ते 2021 या कालावधीमध्ये 10 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. 

सुपरबगमुळे 1990 ते 2021 या कालावधीमध्ये 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात 80 टक्के वाढ झाली आहे. 2021 साली तर हे प्रमाण दुप्पट झाले आहे. त्यावरुन हे संक्रमण किती जीवघेणे आहे, याचा अंदाज येऊ शकेल. 

'सुपरबग' च्या जागतिक प्रभावाचा मागोवा घेऊन पुढे काय होऊ शकते याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच या प्रकारचे संशोधन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नवजात मुलांमध्ये या आजाराचे संक्रमण होण्याच्या प्रमाणत घट झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. पण,  मुलांमध्ये हे संक्रमण झालं तर ते रोखणे अतिशय अवघड असेल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Abrosexuality : तुम्ही देखील Abrosexual आहात का? जगभर चर्चेत असलेली काय आहे ही लैंगिक ओळख? )
 

204 देशांमधील 52 कोटी लोकांच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. 2050 पर्यंत सुपरबगमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 67 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून रोखण्यासाठी आत्तापासूनच प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. आत्तापासून सर्व प्रकारचे प्रयत्न झाले तर 2050 पर्यंत 9 कोटी 20 लाख जणांचा जीव वाचवता येईल, असं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

Topics mentioned in this article