जाहिरात

Abrosexuality : तुम्ही देखील Abrosexual आहात का? जगभर चर्चेत असलेली काय आहे ही लैंगिक ओळख?

Abrosexuality : तुम्ही देखील Abrosexual आहात का? जगभर चर्चेत असलेली काय आहे ही लैंगिक ओळख?
Abrosexuality : लैंगिक ओळखीबाबतच्या या ट्रेंडची सध्या जगभर चर्चा आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Abrosexuality : लैंगिक भाव-भावनांबाबत जगभर संशोधन सुरु असतं. पुरातन काळापासून हा विषय संशोधन आणि कुतुहलाचा विषय ठरला आहे. आधुनिक काळात लैंगिक अभिव्यक्ती मोकळेपणाने प्रकट करण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर या भावना दडपण्याचे तसंच त्याचं अमानवी पद्धतीनं प्रकटीकरण करण्याचे प्रमाणही कायम आहे. लैंगिक इच्छाशक्ती प्रबळ होऊन मनाचं संतुलन बिघडलं की त्यामधून गैरप्रकार घडतात. त्याचवेळी मानवी लैंगिक भावनांबाबत अभ्यासकांचं संशोधनही सुरु आहे. याबाबत निरनिराळ्या संकल्पना जगभर उदयाला येत आहेत. त्यामध्ये  Abrosexual  किंवा  Abrosexuality या लैंगिक भावनांची सध्या जगभर चर्चा आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे  Abrosexuality?

Abrosexuality म्हणजेच लैंगिक तरलता यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक आकर्षणाचे प्रमाण हे कमी-जास्त होत असते. एखाद्या कालखंडात त्या व्यक्तीला समलिंगी आकर्षण वाटू शकतं. त्यामुळे ते स्वत:ला 'गे' असल्याचं जाहीर करतात. पण, कालांतराने त्यांच्या मनात समलैंगिक व्यक्तींच्या ऐवजी भिन्न लिंगांच्य़ा व्यक्तींबद्दल प्रेमभावना जागृत होतात. अथवा कोणत्याही व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात लैंगिक भावना नसतात. 

या प्रकरातील व्यक्तींचे आकर्षणाची पद्धत ही आठवड्यानी, वर्षांनी किंवा काही वर्षांनी बदलू शकते. सामान्यत: त्यांचै लैंगिक आकर्षण काही कालखंडानंतर बदलते. 

या प्रकारची लोकं वेगवेगळ्या वयोगटामध्ये आढळतात. पण विशेषत: जनरेशन झेड म्हणून ओळखले जाणाऱ्या वयोगटात ( ज्यांचा जन्म 1997 ते 2012 दरम्यान झाला) ही अभिव्यक्ती उघडपणे मान्य करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटातील व्यक्तींमधील विविध लैंगिक ओळख खुलेपणाने स्वीकारण्याची वाढती जागृती हे देखील याचं कारण मानलं जातं. 

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
 

 Abrosexual व्यक्ती असण्याची लक्षणं

'हेल्थलाईन' नं या प्रकारच्या व्यक्तींची प्रमुख लक्षणं सांगितली आहेत. 

दैनंदिन चढउतार - तुम्ही एकेदिवशी पुरुषांकडे आकर्षित होता. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला महिला आवडू शकतात.
आकर्षणातील बदल - तुम्हाला सर्व प्रकारच्या लैंगिक गटातील व्यक्तींचे आकर्षण वाटू शकते. त्यानंतर एका विशिष्ट गटातील व्यक्तींबाबत तुमची आवड काही मर्यादीत राहू शकते.
कमी आकर्षणाचा कालावधी - तुम्हाला कदाचित लैंगिक आकर्षणाचा अनुभव येत नसेल. काही महिन्यांनी सर्व गटातील लैंगिक व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागेल.
 तुम्ही कदाचित भिन्नलिंगी पुरुष असाल, परंतु काही वर्षांनंतर, तुम्हाला पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटू लागले.

अर्थात या प्रकारच्या व्यक्ती ओळखण्याच्या या काही प्रमुख पद्धती आहेत. पण, यामधील कोणतीही एक आणि एकमेव पद्धत नाही. या प्रकारच्या आणखी पद्धती असू शकतात. 

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

काय आहेत आव्हानं?

वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक प्रवृत्तीप्रमाणे या प्रकारातील व्यक्तींनाही आव्हांनाचा सामना करावा लागतो. आकर्षणाच्या चढ-उतारांचे स्वरुप त्यांना गोंधळात टाकणारे किंवा वेगळे करणारे असू शकते. लैंगिक प्रवृत्ती स्थिर असावी अशी जगभरात सामान्य अपेक्षा असते. त्यामुळे समजुतीच्या अभावामुळे नातेसंबंध तयार करण्यात अडचणी येऊ शकतात. समसवस्क, कुटंुबीय तसंच संभाव्य जोडीदारांमध्ये यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com