बायकोला घालायची होती बिकिनी, पठ्ठ्याने बेटच विकत घेतलं, किंमत ऐकून थक्क व्हाल

पत्नीला बिकिनी घालण्याची इच्छा झाली होती. अशा वेळी तिची सुरक्षा आणि खाजगी क्षणाचा विचार करता त्याने थेट बेटच विकत घेतलं.

Advertisement
Read Time: 3 mins
दुबई:

पत्नीची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक पतीला जमतेच असे नाही. त्यामुळे अनेक जोडप्यामध्ये वाद ही होत असतात. शिवाय अनेक वेळा ही प्रकरणं अगदी घटस्फोटापर्यंतही पोहोचतात. मात्र ही बातमी वाचल्यानंतर प्रत्येक मुलीला वाटेल की आपल्याला ही असाच पती मिळावा. दुबई राहाणाऱ्या एका विवाहीतेने दावा केला आहे की तिच्या पतीने तिच्यासाठी एक बीच खरेदी केला आहे. सउदी अल नादक असं या 26 वर्षीय विवाहीत तरूणीचं नाव आहे. तिचा पती एक अरबोपती आहे. पत्नीला बिकिनी घालण्याची इच्छा झाली होती. अशा वेळी तिची सुरक्षा आणि खाजगी क्षणाचा विचार करता त्याने थेट बेटच विकत घेतलं. तिने आपल्या इंस्टाग्रामवर या बीच वरील आपल्या पती बरोबरचे काही सुंदर फोटो शेयर केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बिकिनी घालण्यासाठी खरेदी केला बीच (Dubai millionaire buys private island)

बीच खरेदी केल्यानंतर या विवाहीत महिलेने त्याला एक मजेशीर कॅप्शन दिली आहे. ती लिहीते 'POV  म्हणजे प्वाइंट ऑफ व्यू... तुम्हाला बिकिनी घालायची आहे. तर तुमच्या करोडपती पतीने थेट एक बेटच खरेदी केलं' ही महिला ब्रिटीश नागरीक आहे. तिने दुबईतील उद्योगपती जमाल अल नदक यांच्या बरोबर लग्न केलं आहे. ती हाऊस वाईफ आहे. ती सांगते की गुंतवणुकीसाठी ती आणि तिचा पती एक बेट खरेदी करणार होते. तसे त्यांचे नियोजन होते. माझे पती मला बीचवर सेफ पाहू इच्छित होते. त्यामुळे त्यांनी हे बेट खरेदी केले. मात्र हे बेट नक्की कुठे आहे हे मात्र या महिलेने सांगितले नाही. 
 

ट्रोलर्स ची बोलती बंद  ( Dubai millionaire wife)

सउदी अल नदक या महिलेने पतीने तिच्यासाठी बेट खरेदी केल्याचा दावा केला आहे. शिवाय हा किती किंमतीला खरेदी केला हे ही तिने स्पष्ट केले आहे. हे बेट तिच्या पतीने जवळपास 50 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 418 कोटी रूपयांना खरेदी केले आहे. तिचा हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वी समोर आला. त्या वेळी त्याला 24 लाख लोकांनी पाहिला आहे. हीच विवाहीत महिला शो ऑफ करताना अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मात्र तिने आता या सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - नागपूर हिट अँड रन आरोपी रितिका मालूला अखेर मध्यरात्री बेड्या, नेमके प्रकरण काय?

कुठे झाली होती या दोघांची ओळख? ( Dubai millionaire Married Couple)

या दोघांची ओळख दुबईमध्ये झाली होते. हे दोघे ही ज्यावेळी शिक्षण घेत होते त्यावेळची या दोघांची ओळख आहे. तीन वर्षा पूर्वी या दोघांनी लग्न केले. ही महिला विवाहीत असली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत. तिची लाईफस्टाील ती सोशल मीडियावर शेयर करत असते. एका व्हिडीओत ती 1 मिलियन डॉलर किंमतीची हिऱ्याची अंगठी खरेदी करताना दिसत होती. त्यानंतर तिची जोरदार चर्चा सर्वत्र झाली होती.