इटलीच्या पंतप्रधानांच्या पक्षाचा EU च्या संसदीय निवडणुकीत मोठा विजय, जॉर्जिया मेलोनी ठरल्या 'किंगमेकर'

निवडणुकीच्या निकालानंतर मेलोनी इटलीसह युरोपातील एक मजबूत नेत्या म्हणून समोर आल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

27 देशांच्या युरोपियन युनियनमध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. यंदा निवडणुकीत अनेक देशांवर दक्षिणपंथी पक्षांनी विजय मिळवला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा ब्रदर्स ऑफ इटली हा पक्ष युरोपियन युनियनच्या निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर मेलोनी इटलीसह युरोपातील एक मजबूत नेत्या म्हणून समोर आल्या आहेत. हे निकाल राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे असल्याची भावना जॉर्जिया यांनी व्यक्त केली आहे. युरोपियन युनियनच्या निकालानुसार, 27 सदस्यांच्या EU च्या निवडणुकीत यंदा दक्षिणपंथी पक्षांचा बोलबाला राहिला. या निवडणुकीत 720 सदस्यांना निवडण्यासाठी झालेल्या मतदानात 99 टक्के मतांच्या मोजणीनंतर मेलोनी यांचा पक्ष ब्रदर्स ऑफ इटलीने 28.81 टक्के मतं मिळवली. 

या निकालामुळे काय होणार बदल?
युरोपियन युनियनच्या निकालात मेलोनी यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं आहे. परिणामी EU हेडक्वार्टर ब्रसेल्समध्ये त्यांचा प्रभाव वाढेल. EU चे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या पुढील कार्यकाळाबद्दल निर्णयावर मेलोनी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल. यासह EU शी संबंधित सर्व लहान-मोठ्या निर्णयात मेलोनी यांचा हस्तक्षेप पाहायला मिळेल. 

नक्की वाचा - लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी पाकिस्तानचं टेन्शन का वाढलंय?

6 ते 9 जूनदरम्यान EU च्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत तब्बल 40 कोटी नागरिक सहभागी झाले होते. या निवडणुकीची सुरुवात 6 जून रोजी नेदरलँडच्या मतदानापासून झाली. यादरम्यान फ्रान्स, इटली, जर्मनी,ऑस्ट्रिया, इस्टोनिया, लिथुआनिया आणि स्वीडनसारख्या युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं. EU च्या निवडणुकीत धक्कादायक पराभवानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोने संसद भंग करीत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली होती. तर बेल्जियममध्ये सत्ताधारी पक्षाचा EU च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधानमंक्षी एलेक्झेंडर डीक्रू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

Advertisement

काय आहे EU संसद?
युरोपियन संसद हे युरोपीयन नागरिक आणि युरोपातील संघातील संस्थांमध्ये दरम्यान संपर्क स्थापन करण्यासाठी थेट दुवा आहे. ही जगातील एकमेव थेट निवडून आलेली इंटरनॅशनल सभा आहे.