S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड

S. Jaishankar on Donald Trump : 'ऑपरेशन सिंदूर' च्या दरम्यान युद्धविराम करताना भारत आणि अमेरिका यांच्यात काय चर्चा झाली हे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 3 mins
S Jaishankar : परराष्ट्रमंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे.
मुंबई:

S Jaishankar on Donald Trump :  परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं 'आर्थिक युद्ध' असं वर्णन केलं. या हल्ल्याचा उद्देश जम्मू काश्मीरमधील पर्यटन नष्ट करणे होता, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादाला प्रत्युत्तर देताना अणुबॉम्बच्या धमक्या भारताला रोखू शकत नाहीत, या  भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. इस्लामाबादसोबतच्या युद्धविराम करारापूर्वी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यात काय चर्चा झाली हे देखील जयशंकर यांनी सांगितले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले परराष्ट्रमंत्री? 

न्यूयॉर्कमध्ये 'न्यूजवीक'शी बोलताना, परराष्ट्र मंत्र्यांनी पहलगाममधील दहशतवाद हल्ला, ऑपरेशन सिंदूर तसंच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष या कालावधीमध्ये काय घडलं ते सांगितलं.  'ऑपरेशन सिंदूर' च्या कालावधीमध्ये पाकिस्तानला युद्धविराम स्वीकारण्यासाठी व्यापाराचा वापर करण्याची सूचना केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो दावा जयशंकर यांनी फेटाळून लावला. 

जयशंकर यांनी सांगितलं की, ते  पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी मोदींना फोनवर संपर्क साधला होता. त्यामध्ये भारतासाठी व्यापार आणि युद्धविराम यांचा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

( नक्की वाचा :  Rajnath Singh : हातामध्ये पेन होतं पण...राजनाथ सिंह यांचा स्वाक्षरीस नकार! पाकिस्तान, चीनला चांगलेच सुनावले, Video )


'मी तुम्हाला सांगू शकतो की, 9 मे च्या रात्री उपराष्ट्राध्यक्ष वान्स यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानी भारतावर खूप मोठा हल्ला करणार आहेत... आम्ही काही गोष्टी स्वीकारल्या नाहीत आणि पाकिस्तानी ज्या गोष्टींची धमकी देत ​​होते, त्याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले नाही," असे जयशंकर म्हणाले.

'उलट, त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) आमच्याकडून प्रत्युत्तर मिळेल असे अमेरिकेच्या उपाध्यक्षांना सुनावले," असेही जयशंकर यांनी  यावेळी स्पष्ट केलं. 

जयशंकर यांनी सांगितले, 9 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतावर 'मोठ्या प्रमाणावर' हल्ला केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांना तातडीने चोख प्रत्युत्तर दिलं. 

Advertisement

10 मे रोजी काय घडलं?

अमेरिकेसोबतचा दुसरा संपर्क 10 मे रोजी सकाळी झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. त्यावेळी जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचा संवाद झाला होता. त्यामध्ये आम्ही त्यांना 'पाकिस्तानशी बोलणी करण्यास तयार आहोत, असे सांगितले.'

न्यूजवीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव प्रगद यांच्यासोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान जयशंकर म्हणाले,  'मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक अनुभवातून काय घडले तेच सांगू शकेन.'

Advertisement

'भारतावर गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत आणि 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात "आता खूप झाले" अशी भावना होती,   असे त्यांनी स्पष्ट केले. 

'तो आर्थिक युद्धाचाच एक भाग होता. त्याचा उद्देश काश्मीरमधील पर्यटनाला नष्ट करणे हा होता, जेथील अर्थव्यवस्थेचा तो मुख्य आधार आहे. तसेच, धार्मिक हिंसाचार भडकावण्याचाही त्याचा उद्देश होता, कारण लोकांना मारण्यापूर्वी त्यांची धार्मिक ओळख विचारली जात होती,' असे ते म्हणाले.

Topics mentioned in this article