जाहिरात

Emmanuel Macron: बायकोनं फोन पाहिला आणि घात झाला! फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या 'त्या' थप्पडमागचं खरं कारण समोर

Brigitte Macron Slapped French President Emmanuel : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन सध्या एका नव्या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत.

Emmanuel Macron: बायकोनं फोन पाहिला आणि घात झाला! फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या 'त्या' थप्पडमागचं खरं कारण समोर
Brigitte Macron Slapped French President Emmanuel : व्हियतनामधील हनोई विमानतळावर ही घटना घडली होती.
मुंबई:

Brigitte Macron Slapped French President Emmanuel : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन सध्या एका नव्या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत. एका इराणी अभिनेत्रीला मेसेज पाठवल्यामुळे ब्रिजिट यांनी मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली होती का, असा प्रश्न या पुस्तकातील दाव्यांमुळे उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी वियतनाम दौऱ्यादरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याचा संबंध आता या मेसेज प्रकरणाशी जोडला जात आहे.

विमानातील त्या घटनेचा उलगडा

मे 2025 मध्ये व्हियतनामधील हनोई विमानतळावर ही घटना घडली होती. विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर ब्रिजिट मॅक्रॉन यांनी पती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर रागाने हात मारला होता. ही घटना न्यूज एजन्सी एपीच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावेळी राष्ट्रपतींनी ही केवळ पती-पत्नीमधील एक गंमत असल्याचे सांगून वेळ मारून नेली होती. मात्र, राजकीय वार्ताहर फ्लोरियन टार्डीफ यांच्या 'अन कपल (प्रेस्क्यू) परफेक्ट'(Un Couple (Presque) Parfait) या पुस्तकाने आता एक वेगळाच दावा केला आहे.

कथित मेसेज आणि वाद

पुस्तकानुसार, फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी राष्ट्रपतींच्या फोनवर अभिनेत्री गोलशिफ्ते फराहानी हिला पाठवलेला एक मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये मॅक्रॉन यांनी संबंधित अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले होते. हा मेसेज पाहिल्यानंतर ब्रिजिट यांचा राग अनावर झाला आणि त्यातूनच दोघांमध्ये मोठे भांडण झाले. याच वादाचे पर्यवसान विमानतळावर घडलेल्या त्या घटनेत झाल्याचे लेखकाने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

मैत्री की त्याहून अधिक काही

लेखक फ्लोरियन टार्डीफ यांनी आरटीएल रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राष्ट्रपतींनी अभिनेत्रीला पाठवलेले मेसेज हे केवळ औपचारिक नव्हते. त्यांनी मेसेजमध्ये 'तुम्ही मला खूप सुंदर वाटता' असे लिहिले होते, जे ब्रिजिट यांना आवडले नव्हते. मात्र, 42 वर्षीय अभिनेत्री फराहानी आणि राष्ट्रपती मॅक्रॉन या दोघांनीही त्यांच्यात कोणतेही रोमँटिक संबंध असल्याचे नाकारले आहे. त्यांनी हे नाते केवळ मैत्रीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Emmanuel Macron : फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी खरंच पुरुष आहेत? वाचा का आली पुरावा देण्याची वेळ )
 

ब्रिजिट मॅक्रॉन यांची बाजू

दुसरीकडे, ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या निकटवर्तीयांनी या पुस्तकातील दावे फेटाळून लावले आहेत. ब्रिजिट यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्या कधीही आपल्या पतीचा फोन तपासत नाहीत. त्यामुळे मेसेज पाहून थप्पड मारल्याच्या कथेत कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. असे असले तरी, या पुस्तकामुळे फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या जोडप्याची मोठी चर्चा सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com