
Emmanuel Macron Wife: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या कोर्टात मॅक्रॉन यांना त्यांच्या पत्नी ट्रान्सजेंडर नसल्याचा 'पुरावा' सादर करावा लागणार आहे. मॅक्रॉन यांचे वकील, टॉम क्लेअर यांनी सांगितले की, राष्ट्रपती त्यांच्या पत्नीच्या गर्भधारणा आणि मुलांच्या संगोपनाशी संबंधित छायाचित्रे आणि वैज्ञानिक कागदपत्रे कोर्टात सादर करतील.
अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे राजकीय समालोचक कँडेस ओवेन्स यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. टॉम क्लेअर यांनी बीबीसीच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, "हे लोक जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण असले तरी ते सुद्धा माणूस आहेत. त्यांच्यावर गुन्हेगारी कृत्ये केल्याचा आणि जगापासून स्वतःची ओळख लपवल्याचा आरोप करणे अपमानास्पद आणि वेदनादायक आहे. अशा प्रकारचे पुरावे सादर करण्याची वेळ येणे खूप दुर्दैवी आहे."
कसा सुरु झाला वाद?
हा आरोप सर्वात आधी 2017 मध्ये एका ब्लॉगर नताशा रे (किंवा नथाली रे) हिने यूट्यूब व्हिडिओमध्ये केला होता. तिने दावा केला होता की ब्रिजिट मॅक्रॉन खरं तर तिचा भाऊ जीन-मिशेल ट्रोग्नू आहे, ज्याने आपले लिंग आणि नाव बदलले आहे. 2021 मध्ये एका स्पिरिच्युअल मीडियम अमांडीन रॉय यांच्यासोबतच्या मुलाखतीत तिने पुन्हा हाच दावा केला. हा वाद 2022 च्या फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी व्हायरल झाला.
( नक्की वाचा : नेपाळमध्ये 'राजा' पुन्हा येणार? राजेशाहीच्या मागणीला जोर; कोण आहे Gen Z युवराज हृदयेंद्र शाह? )
त्यावेळी या ब्लॉगरने 'पुरावा' म्हणून एक लहानपणीचा फोटो सादर केला, ज्यामध्ये ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या भावाचे स्वरूप त्यांच्याशी मिळते-जुळते होते. जसजशी ही अफवा ऑनलाइन पसरू लागली, मॅक्रॉन दाम्पत्याने ब्लॉगर आणि अमांडीन रॉय यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला, ज्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. पण, जुलै 2025 मध्ये पॅरिस कोर्ट ऑफ अपीलने हा निर्णय रद्द केला.
पुन्हा आरोप का?
मॅक्रॉन यांच्या मागे लागलेलं हे प्रकरण इथेच संपलं नाही. 2024 मध्ये कँडेन्स ओवेन्सनेही हेच आरोप पुन्हा केले आणि हे देखील सांगितले की, ती तिच्या 'संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीची' विश्वासार्हता या दाव्यावर लावू शकते. जुलै 2025 मध्ये, मॅक्रॉन दाम्पत्याने ओवेन्सच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा शेवटचा पर्याय असल्याचं वकील टॉम क्लेअर यांनी स्पष्ट केलं. कारण एक वर्ष ओवेन्सशी संवाद साधून आणि तिला 'सत्य सांगून खोटे पसरवणे थांबवण्यास' सांगूनही काहीच उपयोग झाला नाही.
ओवेन्सने या खटल्याला 'स्पष्ट आणि निराशाजनक पीआर (PR) रणनीती' म्हटले आणि ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यावर 'अतिशय विचित्र माणूस' अशी टीका केली आहे. ओवेन्सच्या यूट्यूब चॅनेलवर 4 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. 2024 मध्ये, त्यांना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा व्हिसाही मिळाला नव्हता, कारण तिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींच्या वैद्यकीय प्रयोगांना नाकारणारी वक्तव्यं केली होती.
( नक्की वाचा : iPhone 16 Price Cut: आयफोन 16 वर सुपर डुपर सूट; 50 हजारांच्या खाली मिळतोय 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत )
मॅक्रॉन दाम्पत्याची गोष्ट
इमॅन्युएल मॅक्रॉन (47) आणि ब्रिजिट मॅक्रॉन (सध्या 72) यांची भेट हायस्कूलमध्ये झाली होती, त्यावेळी ब्रिजिट त्यांची शिक्षिका होत्या आणि त्यांना आधीच तीन मुले होती. त्याच वेळी त्या सेबास्टियन ओजिएरे यांच्याशी विवाहित होत्या. हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात मॅक्रॉन पॅरिसला गेले, पण त्यांनी ब्रिजिटशी लग्न करण्याचे वचन दिले. नंतर ब्रिजिटने त्यांच्या पतीला घटस्फोट दिला. त्या पॅरिसमध्ये मॅक्रॉनसोबत राहू लागल्या.
त्यानंतर 2007 मध्ये दोघांनी लग्न केले. इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या त्यांचा दुसरा आणि अंतिम अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या दाम्पत्यामधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरही वाद झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world