Teacher Student Relationship Case: एका उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील धक्कादायक संबंधांची एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि इतर विद्यार्थ्यांना चुकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अलेक्झांडर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संबंधित 25 वर्षांच्या जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी विषयाच्या शिक्षिकेचे नाव मारिस निकोल्स असे असून ती शाळेच्या फुटबॉल टीमची व्यवस्थापक म्हणूनही काम पाहत होती. तिच्यावर एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत 2 वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असून मे महिन्यात तिला 2 वेळा अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा 23 एप्रिल रोजी शाळेतील एका कपाटात आणि दुसऱ्यांदा 2 मे रोजी एका गाडीमध्ये हे कृत्य घडल्याचे तपासात समोर आले होते.
( नक्की वाचा : Triple Murder: आधी आईला संपवून रक्ताचे डाग धुतले, मग बहीण-वडिलांची वाट पाहिली; पोटच्या मुलीचे धक्कादायक कृत्य )
ब्लॅकमेलिंगचा नवा पॅटर्न
पोलिसांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार, मारिसने 3 मे रोजी आणखी एका दुसऱ्या विद्यार्थ्यासोबतही शारीरिक संबंध ठेवले होते. इतकेच नाही तर तिने अनेक विद्यार्थ्यांना तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते. यापैकी एका विद्यार्थ्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ तिने स्वतःच मेसेजद्वारे पाठवला होता. हा व्हिडिओ शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये वेगाने पसरला. हाच व्हिडिओ हाती लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षिकेलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
मारिस निकोल्स हिचे 'ओन्लीफॅन्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अकाउंट होते. विद्यार्थ्यांनी तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ओन्लीफॅन्स अकाउंटवरील व्हिडिओ इंटरनेटवर लीक करण्याची धमकी दिली. या धमकीच्या बदल्यात विद्यार्थ्यांनी शिक्षिकेकडे पैशांची मागणी केली नाही, तर परीक्षेत चांगले ग्रेड म्हणजेच जास्त गुण देण्याची मागणी केली. गुणांसाठी शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 27 वेगवेगळे सर्च वॉरंट जारी केले आहेत. मारिस निकोल्स हिच्यावर सध्या पुरावे नष्ट करणे, बाल लैंगिक शोषण (चाइल्ड मोलेस्टेशन), कर्मचाऱ्याकडून अयोग्य लैंगिक संपर्क आणि अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणे (ग्रुमिंग) अशा विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामिनासाठी धडपड
अटकेनंतर मारिस सध्या जामिनावर बाहेर असून तिच्यावर कडक अटी घालण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार तिला तिच्या स्वतःच्या मुलीशिवाय इतर कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीशी संपर्क ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, मारिसच्या वकिलांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करून या अटींमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली आहे, जेणेकरणून तिला तिच्या 17 वर्षांच्या लहान भावाला भेटता येईल. तिने जामिनाच्या सर्व नियमांचे पालन केले असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world