US Bus Accident : सेंट्रल अमेरिकेतीस ग्वाटेमाला देशात सोमवारी एक भीषण अपघात झाला. सकाळच्या सुमारास एक प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन जात असताना दरीत कोसळली. या अपघातात किमात 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आलं आहे. या भीषण अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस शहरात आणि शहराबाहेरील व्यग्र मार्गावरुन प्रवास करीत होती. यादरम्यान चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने बस थेट दरीत कोसळली. यापूर्वी बसने अनेक लहान वाहनांना धडकही दिली.
दरम्यान अमेरिकेत सोमवारी आणखी एक अपघात झाला. हा अपघात एरिजोनाच्या स्कॉट्सडेल विमानतळावर सोमवारी दुपारी झाला. ज्यात दोन खासगी जेट विमानांमध्ये धडक झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि अन्य जखमी झाले आहेत.
बातमी अपडेट होत आहे.