Gujrat Accident: श्रीमंतीचा माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडलं, अपघातानंतर नाचत ओरडला, 'निकिता...' पाहा VIDEO

Gujrat Vadodara Car Accident: अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Gujrat hit And Run Viral Video: गुजरातच्या वडोदरामधून एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तिघांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडोदरामधील करेलीबाग हा गजबजलेला परिसर आहे. या भागात एका काळ्या रंगाच्या भरधाव कारने तीन दुचाकींना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झालेत.  हेमालीबेन पटेल असे या महिलेचे नाव असून  जैनी (वय 12), निशाबेन (वय 35), एक 10 वर्षांचा मुलगा आणि आणखी एक 40 वर्षांची व्यक्ती जखमी झाली आहे. 

हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एयर बॅग्सही उघडल्या आणि कारचाही चक्काचूर झाला. ही गाडी प्रांशू चौहान याच्या मालकीची असून अपघातावेळी त्याचा मित्र रक्षीत चौरासिया गाडी चालवत होता. रविश चौरासिया मध्यप्रदेशचा असून तो वडोदरा येथील एमएस विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करतो. अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या. 

नक्की वाचा - Smart Pension Plan: गुंतवणूक एकदा, आयुष्यभर फायदा! काय आहे LIC 'स्मार्ट' पेन्शन योजना'? पाहा A to Z माहिती

Advertisement

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, अपघातानंतर चालकाच्या शेजारी बसलेला प्रांशू माझी चूक नाही तो गाडी चालवत होता, असे म्हणत निघून गेला. तर गाडी चालवणारा तरुण रक्षीत जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने गाडीला एक फेरी मारली आणि अन अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता असे ओरडू लागला

 तसेच जमाव संतप्त झाल्यानंतर तो ओम नमः शिवाय, ओम नम: शिवायच्या घोषणाही दिल्या. दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  पोलिसांनी कार चालक रक्षित रवीशला अटक केली आहे, तर त्याचा मित्र प्रांशू चौहानचा शोध सुरू आहे.

नक्की वाचा - Crime news: वर्षभरात 42 हत्या, 52 हाफ मर्डर,'या' जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस